Electric Vehicle : पेट्रोल आणि डिझेलच्या वाढणाऱ्या किंमतीमुळे आता कार खरेदी करणाऱ्यांचा कल इलेक्ट्रिक वाहनांकडे वळतो आहे. पेट्रोल आणि डिझेल वाहनांपेक्षा इलेक्ट्रिक वाहनं महाग आहेत, परंतु सरकारने त्यांना खरेदी करण्यासाठी दिलेल्या सवलतीमुळे लोक आता इलेक्ट्रिक वाहनांच्या बुकिंगसाठी पुढे येत आहेत. ओला आणि इतर इलेक्ट्रिक वाहन कंपन्यांनी नुकत्याच लाँच केलेल्या स्कूटीला मिळालेल्या उदंड प्रतिसादावरून हे सिद्ध झाले आहे. पीटीआयच्या अहवालानुसार, लक्झरी कार निर्माता कंपनी BMW च्या इलेक्ट्रिक स्पोर्ट्स अॅक्टिव्हिटी व्हेईकल (SAV) चा पहिला लॉट लॉन्च झाला त्याच दिवशी विकलाही गेला. (What do I need to know before buying an electric vehicle?)


परंतू लोक जसे इलेक्ट्रिक वाहनांमध्ये रस घेत आहेत, त्याचप्रमाणे त्यांच्या विम्याबाबतही प्रश्न विचारले जात आहेत. अशा परिस्थितीत इलेक्ट्रिक वाहनाचा विमा घेताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.


कव्हरेज - 
डिझेल-पेट्रोल वाहनांपेक्षा इलेक्ट्रिक वाहने महाग असल्याने, पुरेसं कव्हरेज असलेली पॉलिसी घ्यायला हवी म्हणजेच तुम्ही सर्वसमावेशक (Comprehensive) कव्हरेज विकत घेतल्यास, ते तुम्हाला थर्ड पार्टीच्या लाइबिलिटीज् आणि वाहनाला झालेल्या नुकसानापासून संरक्षण देते. OD कव्हरेज मुळे अपघात, नैसर्गिक आपत्ती, दंगल आणि आगीमुळे वाहनाचे नुकसान किंवा चोरी झाल्यास बिलांच्या दुरुस्तीमध्ये फायदा मिळू शकतो. वैयक्तिक अपघात (Personal Accident) कवच घेतल्यास, तुम्हाला शारीरिक दुखापत, आंशिक किंवा पूर्ण अपंगत्व किंवा मृत्यू झाल्यास सुरक्षा कवच मिळते.


इन्शुरन्स डिक्लेअर मूल्य - 
विमाधारक घोषित मूल्य म्हणजे इन्शूरन्स डिक्लिअर्ड मूल्य (IDV) जितकं जास्त असेल तितका प्रीमियम जास्त असेल. परंतू कोणतंही नुकसान झाल्यास जास्तीची IDV तुम्हाला अधिक भरपाई देते. इलेक्ट्रिक वाहनं महाग असल्यानं जास्तीची IDV असलेली पॉलिसी घेतली घ्यावी जेणेकरुन तुम्हाला नुकसान झाल्यास अधिक क्लेम मिळू शकेल.


प्रीमियम - 
प्रीमियम ठराविक अंतराने भरावा लागत असल्याने तो अशा प्रकारे निवडा की तो भरताना तुम्हाला कोणतीही गैरसोय होणार नाही. पण कव्हरेजमध्ये तुम्ही तडजोड करत नाही हेही बघायला हवे. परवडणाऱ्या प्रीमियम वर जास्तीत जास्त कव्हरेज देऊ शकणारी पॉलिसी निवडा.


क्लेम सेटलमेंट प्रमाण - 
विमा पॉलिसी खरेदी करताना क्लेम सेटलमेंट रेशो हा एक महत्त्वाचा पॅरामीटर आहे. कंपनीचा क्लेम सेटलमेंट रेशो कसा आहे हे पाहणे महत्त्वाचे आहे. एखाद्याने नेहमी अशा कंपनीकडून विमा पॉलिसी खरेदी केली पाहिजे जिथे क्लेम सेटलमेंट कोणत्याही अडचणीशिवाय करता येते.


अॅड-ऑन - 
इलेक्ट्रिक वाहनासाठी विमा पॉलिसी खरेदी करताना तुम्ही अतिरिक्त फायदेदेखील जोडून घेऊ शकता म्हणजेच अॅड-ऑन. मात्र, यासाठी तुम्हाला जास्त प्रीमियम भरावा लागेल. तुम्ही सर्वसमावेशक धोरणांतर्गत अॅड-ऑन पूर्ण करू शकता.
उदाहरणार्थ – तुम्ही झिरो डेप्रिसिएशन बेनिफिट (Zero Depreciation) जोडू शकता. याचा अर्थ क्लेमच्या रकमेत Depreciation जोडलं जात नाही आणि तुम्हाला नुकसानीची पूर्ण रक्कम मिळते.


Car loan Information:

Calculate Car Loan EMI