Discount on Maruti Suzuki Car : मारुती सुझुकी (Maruti Suzuki) आपल्या लोकप्रिय एसयूव्हीवर (SUV) बंपर सूट देत आहे. कंपनीने या वाहनाच्या किमतीत यापूर्वी 10,000 रुपयांची वाढ केली होती. पण, आता कार उत्पादक कंपनी या मॉडेलवर 80 हजार रुपयांपर्यंतच्या वेगवेगळ्या ऑफर देत आहे. मारुती या मॉडेलवर रोख सूट आणि एक्सचेंज बोनस दोन्ही देत ​​आहे. कंपनीची ही ऑफर फक्त मार्च महिन्यापुरती मर्यादित आहे.


मारुतीच्या या SUV वर बंपर ऑफर


मारुती सुझुकीच्या ग्रँड विटारा या लोकप्रिय एसयूव्हीवर बंपर ऑफर दिली जात आहे. कंपनी या मॉडेलवर 80 हजार रुपयांपर्यंत सूट देत आहे. मारुतीच्या या कारवर 30 हजार रुपयांपर्यंतची कॅश डिस्काउंट दिली जात आहे. याशिवाय या वाहनावर 50 हजार रुपयांपर्यंतचा एक्सचेंज बोनसही उपलब्ध आहे. ही ऑफर फक्त मार्च महिन्यापुरती मर्यादित आहे. वेगवेगळ्या ठिकाणांनुसार या ऑफरमध्ये काही बदल दिसू शकतात.


यापूर्वीही वाडली होती किंमत 


गेल्या महिन्यात मारुती सुझुकीने ग्रँड विटाराच्या किमतीत 10,000 रुपयांनी वाढ केली होती. याशिवाय मारुतीने इतर अनेक मॉडेल्सच्या किमती 10,000 रुपयांनी वाढवल्या होत्या. केवळ कंपनीच्या डेल्टा स्मार्ट हायब्रिड एटी, झेटा स्मार्ट हायब्रिड एटी, अल्फा स्मार्ट हायब्रीड एटी आणि अल्फा ड्युअल टोन स्मार्ट हायब्रिड एटी मॉडेल्सच्या किमतींमध्ये कोणताही बदल झालेला नाही.


या कारला देणार जबरदस्त टक्कर 


मारुती सुझुकी ग्रँड विटाराची प्रतिस्पर्धी कार टोयोटा हायरायडर आहे. Toyota Highrider ची एक्स-शोरूम किंमत 11.14 लाख रुपयांपासून सुरू होते आणि 20.19 लाख रुपयांपर्यंत जाते. कंपनीच्या वेबसाइट nexaexperience.com नुसार , Maruti Suzuki Grand Vitara ची एक्स-शोरूम किंमत 10.80 लाख रुपयांपासून सुरू होते. मारुतीची ही कार 27 kmpl चा मायलेज देते. या मजबूत हायब्रिड प्रकारावर कंपनीला सर्वाधिक सूट मिळत आहे.


महत्त्वाच्या बातम्या :


पेमेंटसाठी आता फोन, कार्ड विसरा; एक रूपयापासून ते 25 हजारांपर्यंत करू शकता ऑनलाईन पेमेंट; Airtel स्मार्टवॉचचं भन्नाट फीचर


Car loan Information:

Calculate Car Loan EMI