Tata Tiago Cng On Road Price: Tata Motors ने Tigor चा CNG व्हेरिएंट लॉन्च केला आहे. टाटा मोटर्सने या वर्षाच्या सुरुवातीला वाहनांची ICNG रेंज सादर केली होती. ज्याला भारतीय बाजारातून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. iCNG रेंजच्या यशामुळे कंपनी आता Tigor चा XM व्हेरिएंट iCNG पर्याय घेऊन आली आहे. नुकत्याच लॉन्च झालेल्या Tata Tigor XM ICNG ची किंमत 7,39,900 रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) आहे. टाटा मोटर्स डेटोना ग्रे,अॅरिझोना ब्लू, डीप रेड आणि ओपल व्हाईट रंग पर्यायांमध्ये टिगोर XM iCNG लॉन्च केली आहे.
मिळणार जबरदस्त मायलेज
Tigor XM iCNG मध्ये 4 स्पीकर सिस्टमसह हरमन इन्फोटेनमेंट सिस्टम, सेंट्रल लॉकिंग, रियर पार्किंग सेन्सर्स, पॉवर विंडो आणि बरेच फीचर्स देण्यात आले आहेत. कारचे पॉवरिंग 3-सिलेंडर 1.3-लिटर BS6 इंजिन आहे. जे पेट्रोल मोडवर 84.8 Bhp आणि 113 Nm टॉर्क आणि CNG मोडवर 73.2 Bhp आणि 95 Nm टॉर्क जनरेट करते. पेट्रोल मोडमध्ये Tata Tigor 19.27 kmpl मलेज देते आणि CNG मोडमध्ये 26.49 km/kg मायलेज देते, असा दावा कंपनीने केला आहे. टिगोरमध्ये तीन-सिलेंडर पेट्रोल इंजिन उपलब्ध आहे. तर डिझायरमध्ये चार-सिलेंडर युनिट उपलब्ध आहे. असं असलं तरी मारुती डिझायरचे इंजिन टिगोरपेक्षा अधिक शक्तिशाली आहे आणि सीएनजीला प्रति किलो अधिक मायलेजही देते.
iCNG व्हेरिएंटची सर्वाधिक मागणी
या कारच्या लॉन्चिंग दरम्यान टाटा मोटर्सचे उपाध्यक्ष राजन अंबा म्हणाले, “Tigor हे आमच्यासाठी अतिशय खास उत्पादन आहे आणि ICNG प्रकाराच्या जोडणीमुळे आमची गती आणखी वाढली आहे. सध्या Tigor च्या 75% पेक्षा जास्त ग्राहक बुकिंग iCNG व्हेरिएंटसाठी येत आहेत. जे Tigor पोर्टफोलिओमध्ये या तंत्रज्ञानाच्या जोरदार मागणीचा पुरावा आहे.
दरम्यान, याच्या बेस मॉडेल XM CNG मध्ये स्टील व्हील्स, OVRM माउंटेड टर्न इंडिकेटर, इलेक्ट्रिकली ऍडजस्टेबल फोल्डेबल OVRM, ब्लूटूथ सक्षम इन्फोटेनमेंट सिस्टम, स्टीयरिंग माउंटेड ऑडिओ कंट्रोल आणि रिअर सेंटर आर्मरेस्ट यांसारखी फीचर्स देखील आहेत. याशिवाय हे मॉडेल फ्रंट फॉग लॅम्प आणि पुश बटण स्टार्ट स्टॉप बटण यांसारख्या फीचर्ससह येते.
महत्वाच्या बातम्या :
- नवीन Hyundai Tucson भारतात लॉन्च, जबरदस्त फीचर्ससह किंमत आहे...
- Hyundai Discount Offers: रक्षाबंधनाला Hyundai ची डिस्काऊंट ऑफरची भेट, जाणून घ्या खास संधीबाबत
- Maruti Alto K10 First Look Review: येत आहे नवीन Maruti Alto K10, Celerio पेक्षा कमी असेल किंमत?
Car loan Information:
Calculate Car Loan EMI