New MG Hector Facelift Revealed : सणासुदीचे दिवस सुरु झाले आहेत. प्रत्येकजण या सणासुदीला काहीतरी नवीन वस्तू घेण्याचा विचार करत असतो. अशातच एमजी मोटरने (MG Motor) त्याच्या आगामी हेक्टर फेसलिफ्टचा फर्स्ट लूक रिव्हील केला आहे. यामध्ये एक मोठा डायमंड ग्रिल अप-फ्रंट आहे. नवीन हेक्टरला नवा लूक देण्यात आला आहे. पूर्वीचा DRL सेट-अप कायम ठेवला आहे. 


कारच्या इंटर्नल भागात सर्वात मोठा बदल म्हणजे यामध्ये नवीन 14-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम असेल, जो भारतात आतापर्यंत विकल्या गेलेल्या कारच्या बाबतीत सर्वात मोठा बदल आहे. MG ची मागील टीझर इमेज नवीन AC व्हेंट्ससह सुधारित डॅशबोर्ड डिझाइन आणि नवीन गियर लीव्हरसह नवीन प्रवाही डिझाइन प्राप्त करणारे सेंटर कन्सोल देखील दर्शवते.


New MG Hector चे फिचर्स : 


New MG Hector Facelift कारमध्ये पॅनोरॅमिक सनरूफ, कनेक्टेड कार टेक, 360-डिग्री व्ह्यू कॅमेरा आणि बरेच काही यांसारख्या वैशिष्ट्यांसह आणखी काही वैशिष्ट्ये देण्यात येणार आहेत. नवीन एमजी हेक्टरमध्ये पेट्रोल आणि डिझेल इंजिनच्या समान संचासह इंजिनच्या समोर फारसा बदल होणार नाही. तसेच, पेट्रोलला CVT स्वयंचलित पर्याय मिळेल तर डिझेल फक्त मॅन्युअल राहील.


एकंदरीतच कारच्या SUV च्या स्पीडमध्ये काही बदलाची अपेक्षा करू शकतो. तर आणखी एक महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य म्हणजे ADAS वैशिष्ट्यांचा समावेश आहे. जे आतापर्यंत Astor आणि Gloster वर दिसले आहे. New MG Hector  कार या वर्षाच्या अखेरीस लॉन्च होण्याची शक्यता आहे. 


महत्वाच्या बातम्या : 



Car loan Information:

Calculate Car Loan EMI