Citroen India: फ्रेंच कार उत्पादक कंपनी Citroen ने आपल्या नवीन इलेक्ट्रिक कार eC3 साठी बुकिंग सुरू केल्याची घोषणा केली आहे. ही कार बुक करण्यासाठी ग्राहकांना कंपनीच्या डीलरशिप किंवा Citroen च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल. यासाठी ग्राहकांना 25,000 ची टोकन रक्कम जमा करावी लागेल. ही कार फेब्रुवारी 2023 मध्ये लॉन्च होण्याची शक्यता आहे आणि लॉन्च सोबतच या कारच्या किमतीही जाहीर केल्या जातील. याच कारबद्दल अधिक माहिती जाणून घेऊ...  


Citroen India: कशी आहे डिझाइन?


या कारमध्ये फ्रंट फेंडरवर चार्जिंग पोर्ट देण्यात आला आहे. ही कार बऱ्यापैकी आपल्या जुन्या मॉडेलसारखीच आहे. मात्र याच्या इंटीरियरमध्ये काही बदल नक्कीच होतील. गीअर लीव्हरच्या जागी ड्राइव्ह मोड निवडण्यासाठी त्यास मध्यवर्ती कन्सोलमध्ये बटणे मिळतात.


Citroen India: फक्त 6.8 सेकंदात 0-60 किमी प्रतितास वेग पकडू शकते


Citroen eC3 मध्ये सिंगल इलेक्ट्रिक मोटर सेटअप देण्यात आला आहे, जो 57 hp पॉवर आणि 143 Nm टॉर्क जनरेट करू शकतो. या इलेक्ट्रिक मोटरसह eC3 फक्त 6.8 सेकंदात 0-60 किमी प्रतितास वेग पकडू शकते आणि 107 किमी प्रतितास या वेगाने पोहोचू शकते. यामध्ये पॉवरसाठी 29.2 kWh चा सिंगल बॅटरी पॅक वापरण्यात आला आहे. ज्यासाठी 3.3 kW चा ऑनबोर्ड एसी चार्जर देण्यात आला आहे. तसेच डीसी चार्जरच्या मदतीने ही कार केवळ 57 मिनिटांत 10 ते 80 टक्के चार्ज करता येते. ही कार एसी चार्जरने 10-100 टक्के चार्ज करण्यासाठी 10.5 तास लागतात. ही कार प्रति चार्ज 320 किमीची रेंज देण्यास सक्षम आहे.


Citroen India: फीचर्स


इलेक्ट्रिक C3 लाईव्ह आणि फील या दोन प्रकारांमध्ये लॉन्च केले जाईल. ज्यामध्ये वायरलेस Apple CarPlay/Android Auto सह 10.2-इंच इन्फोटेनमेंट सिस्टम, 4-स्पीकर ऑडिओ सिस्टम यासारखे फीचर्स मिळू शकतात. यासोबतच EBD आणि ABS सह ड्युअल एअरबॅगसह इतर अनेक फीचर्स देण्यात आले आहेत.


टाटा टियागो ईव्हीशी करेल स्पर्धा 


सिट्रोएनची ही ईव्ही टाटा टियागो ईव्ही आणि टिगोर ईव्हीशी स्पर्धा करेल. या कारच्या ICE मॉडेलची एक्स-शोरूम किंमत 5.71 लाख ते 8.06 लाख रुपयांदरम्यान आहे आणि नवीन eC3 ची एक्स-शोरूम किंमत 10 लाख रुपयांच्या (संभाव्यपणे) जवळ असू शकते.


इतर ऑटो सेगमेंट संबंधित बातमी: 


2023 Hyundai Aura Facelift: 30 पेक्षा जास्त सेफ्टी फीचर्ससह Hyundai Aura लॉन्च, किंमत 6.30 लाख रुपये


Car loan Information:

Calculate Car Loan EMI