2023 Hyundai Aura Facelift launched: वाहन उत्पादक कंपनी Hyundai Motor India ने आपले 2023 Aura फेसलिफ्ट मॉडेल लॉन्च केले आहे. याची प्रारंभिक किंमत 6,29,600 रुपये (एक्स-शोरूम) ठेवण्यात आली आहे. या अपडेटेड मॉडेलमध्ये डिझाइन, तसेच सुरक्षेच्या दृष्टीने अनेक अपडेट्स करण्यात आले आहेत. सेडानमध्ये 30 पेक्षा जास्त सेफ्टी फीचर्स देण्यात आले आहेत. ज्यात चार एअरबॅग आणि सहा एअरबॅगचा पर्याय देखील आहेत. ही कार स्टॅरी नाईट नावाच्या नवीन रंगासह सहा मोनोटोन बाह्य रंग पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. याच कारबद्दल आपण अधिक माहिती अजनून घेणार आहोत.  


2023 Hyundai Aura Facelift launched: डिझाइन 


या नवीन कराच्या डिझाइनबद्दल बोलायचे झाले तर, ऑरा फेसलिफ्टच्या आतील भागात काही कॉस्मेटिक बदल करण्यात आले आहेत. ही कार सेफ्टी आणि मॉडर्न फीचर्ससह येते. या सेडानच्या बाहेरील बाजूस ब्लॅक आऊट रेडिएटर ग्रिल आणि पुढच्या बंपरवर नवीन एलईडी डेटाइम रनिंग लॅम्प (DRLs) आहेत. यामध्ये विशेषत: फ्रंट बंपर देखील ऑराला नवीन लूक  देतो. नवीन Aura फेसलिफ्ट R15 डायमंड कट अलॉय व्हीलसह येते, जे ही कार आणखी आकर्षण बनवते. क्रोमच्या बाहेरील दरवाजाचे हँडल ब्लिंगमध्ये भर घालतात. मागील बाजूस या सेडानला विंग स्पॉयलर मिळतो, ज्यामुळे ही कार अधिक रुंद, स्पोर्टियर आणि अधिक शार्प दिसते. आतील बाजूस सेडानला एक नवीन सीट फॅब्रिक डिझाइन आणि पॅटर्न मिळतो. पुढे ग्लॉसी ब्लॅक इन्सर्टसह नवीन डिझाइन फॅब्रिक अपहोल्स्ट्री, लेदर-रॅप्ड स्टीयरिंग व्हील आणि गियर नॉब, गियर नॉबवर क्रोम फिनिश, दरवाजाच्या हँडलमध्ये मेटल फिनिशसह पार्किंग लीव्हर टिप्स आणि ऑरा ब्रँडिंग लोगो मिळतो.


2023 Hyundai Aura Facelift launched: सेफ्टी फीचर्स 


इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल, व्हेईकल स्टॅबिलिटी मॅनेजमेंट आणि हिल स्टार्ट असिस्ट कंट्रोल ही नवीन ऑरामधील काही सेफ्टी फीचर्स आहेत. जी स्मार्ट ऑटो एएमटीसह आणि पाच-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन पर्याय म्हणून ऑफर केली जातात. ऑरा फेसलिफ्ट नवीन फर्स्ट-इन-सेगमेंट टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम आणि बर्गलर अलार्म आणि ऑटोमॅटिक हेडलॅम्प यांसारख्या इतर नवीन फीचरने सुसज्ज आहे.


2023 Hyundai Aura Facelift launched: इंजिन 


ही कार तीन इंजिनसह येते. पाच-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशनसह 1.2-लीटर पेट्रोल, स्मार्ट ऑटो AMT सह 1.2-लीटर पेट्रोल आणि पाच-स्पीड मॅन्युअल ट्रांसमिशनसह 1.2-लीटर ड्युअल-इंधन (पेट्रोल) CNG आहे.


 


Car loan Information:

Calculate Car Loan EMI