Citroen 7 Seater MPV: फ्रेंच कार कंपनी Citroen सातत्याने भारतात आपले मजबूत स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. गेल्या वर्षी देशात दोन कार लॉन्च केल्यानंतर आता कंपनी लवकरच आपली पहिली इलेक्ट्रिक कार eC3 बाजारात आणणार आहे. अशीही बातमी आहे की, कंपनी लवकरच बाजारात कमी किमतीची 7-सीटर MPV कार लॉन्च करू शकते. ज्याचे नाव Citroen Berlingo असण्याची अपेक्षा आहे. ही कार बाजारात थेट मारुती एर्टिगा आणि किया केरेन्सशी टक्कर देईल. कंपनी भारतीय रस्त्यांवर बर्लिंगोची टेस्टही करत आहे. चला जाणून घेऊया या कारच्या काही खास गोष्टी.
Citroen 7 Seater MPV: ही एक मोठी फॅमिली कार असेल
Citroen आधीच बर्लिंगो MPV अनेक युरोपियन देशांमध्ये विकत आहे. ही कार PSA च्या नवीन EMP2 आर्किटेक्चरवर तयार करण्यात आली आहे. ही कार मोठ्या कुटुंबातील लोकांना लक्षात घेऊन तयार करण्यात आली आहे. या वाहनाची लांबी 4.4 मीटर ते 4.75 मीटर दरम्यान असणे अपेक्षित आहे.
Citroen 7 Seater MPV: खर्च लूकही आहे जबरदस्त
Citroen Berlingo च्या डिझाइनबद्दल बोलायचे झाले तर, यामध्ये ब्लॅक क्लेडिंग अलॉय व्हील दिसू शकतात, मागील आणि पुढच्या बंपरवर स्प्लिट हेडलॅम्प आणि सिग्नेचर फ्रंट ग्रिल देखील दिले जातील. यासोबतच आलिशान आणि आरामदायी इंटिरिअर, वायरलेस स्मार्टफोन कनेक्टिव्हिटीसह मोठी टचस्क्रीन, अनेक एअरबॅग्ज आणि ऑटोमॅटिक एसी ही इतर अनेक फीचर्स या कारमध्ये पाहायला मिळतील.
Citroen 7 Seater MPV: कसे असेल इंजिन?
Citroen Berlingo मध्ये इंजिन पर्याय म्हणून 1.5 लिटर पेट्रोल इंजिन आणि 1.5 लिटर डिझेल इंजिन दिले जाऊ शकते. हे इंजिन 108 bhp ते 128 bhp दरम्यान पॉवर निर्माण करू शकतात. यामध्ये 6 स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स देखील दिसू शकतो. कंपनी लवकरच या MPV बद्दल अधिकृत घोषणा करू शकते.
Maruti Suzuki Ertiga : मारुती अर्टिगाशी करेल स्पर्धा
Citroen ची नवीन कार मारुती सुझुकी Ertiga शी स्पर्धा करेल. या कारमध्ये 1462 cc BS6 पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. ही कार 8.35 लाख रुपये, एक्स-शोरूमपासून सुरू होणाऱ्या किमतीसह सध्या सेगमेंटमध्ये सर्वाधिक विक्री होणारी MPV आहे.
इतर ऑटो सेगमेंट संबंधित बातमी:
Car loan Information:
Calculate Car Loan EMI