Maruti Baleno S-CNG vs Toyota Glanza E-CNG : दिग्गज कार निर्माता कंपनी टोयोटा किर्लोस्करने नुकतीच आपली हॅचबॅक कार ग्लान्झाला (Glanza) सीएनजी व्हर्जनमध्ये लॉन्च केले आहे. ही कंपनीची पहिलीच सीएनजी कार आहे. ही कार भारतीय बाजारात मारूती सुझुकीच्या बलेनो S-CNG (Maruti Baleno) ला टक्कर देणार आहे. जर तुम्ही देखील यापैकी एक कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर या ठिकाणी आम्ही दोन्ही कारची तुलना केली आहे. ते पाहा.
लूक कसा आहे?
टोयोटा ग्लान्झा सीएनजीला रूफ-माउंट केलेले स्पॉयलर, फॉग लॅम्प हाउसिंगसाठी सी-आकाराचे क्रोम सराउंड, पॉवर अँटेना, रुंद एअर डॅम, ब्लॅक्ड-आउट ग्रिल, मस्क्युलर बोनेट आणि क्रोम बाह्यरेखा यासह अपडेटेट करण्यात आली आहे. तर, बलेनो सीएनजीला रीडिझाईन बॉडी पॅनलसह थोडा वेगळा लूक देण्यात आला आहे. कार आधीच्या तुलनेत थोडी मोठी दिसते. बाकी कारचा संपूर्ण लूक सध्याच्या मॉडेलसारखाच आहे.
इंजिन कसे आहे?
Glanza ला 1.2-लिटर पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे जे BS6 मानकांची पूर्तता करते. कंपनीने सीएनजी किटसह ग्लान्झा सीएनजीमध्ये हे इंजिन समाविष्ट केले आहे. ही कार एक किलो सीएनजीमध्ये 30.61 किलोमीटर अंतर कापण्यास सक्षम आहे. मारुती सुझुकी बलेनो एस-सीएनजी देखील इंजिन स्टार्ट/स्टॉप टेक्नॉलॉजीसह 1.2-लीटर ड्युअलजेट पेट्रोल इंजिनसह सुसज्ज आहे. हे इंजिन 76.4hp पॉवर आणि 98.5Nm पीक टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे.
वैशिष्ट्ये कशी आहेत?
वैशिष्ट्यांच्या बाबतीत बोलायचे झाल्यास, या दोन्ही कारमध्ये कनेक्टेड कार टेक, 360-डिग्री कॅमेरा, एअरबॅग्ज, पार्किंग कॅमेरा, अँड्रॉइड ऑटो, 9-इंच टचस्क्रीन सिस्टम, हेड-अप डिस्प्ले, वायरलेस फोन चार्जर, ऍपल कारप्लेसह 5-सीटर केबिन मिळेल. सपोर्ट, वायरलेस फोन चार्जर, नवीन इन्स्ट्रुमेंट क्लस्टर यांसारख्या वैशिष्ट्यांसह इतर अनेक फीचर्स देण्यात आले आहेत.
कोणती कार सर्वोत्तम आहे?
Toyota Glanza CNG ची देशातील किंमत 8.43 लाख रुपयांपासून सुरू होते. त्याचे टॉप मॉडेल 9.46 लाख रुपयांच्या एक्स-शोरूम किमतीत उपलब्ध आहे. तर Maruti Suzuki Baleno S-CNG ची एक्स-शोरूम किंमत 8.28 लाख ते 9.21 लाख रुपये आहे. मारुती बलेनो टोयोटा ग्लान्झा पेक्षा किंचित स्वस्त आहे. परंतु, ग्लान्झाचा लूक आणि उत्कृष्ट बिल्ड गुणवत्तेच्या बाबतीत खूप पुढे आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
Car loan Information:
Calculate Car Loan EMI