Toyota Innova Hycross Vs Mahindra Scorpio N : टोयोटोने नुकतीच देशात आपली नवीन हायब्रीड एमपीव्ही कार अपडेटेट कार इनोव्हा हायक्रॉस सादर केली आहे. भारतातील पेट्रोल-हायब्रीड पॉवरट्रेनसह येणारी ही पहिली MPV असणार आहे. ही कार भारतात 2023 मध्ये लॉन्च होणार आहे. त्याचवेळी या कारला टक्कर देण्यासाठी महिंद्राची Scorpio-N SUV काही महिन्यांपूर्वीच बाजारात आली आहे. टोयोटो इनोव्हा हायक्रॉस आणि महिंद्रा स्कॉर्पिओ एन या दोन्ही कारमध्ये नेमके काय साम्य आणि काय तुलना आहे ते पाहा.


लूक कसा आहे?


नवीन Mahindra Scorpio-N ला बॉक्सी डिझाईन आहे. SUV ला बंपर-माउंट केलेले LED DRLs, रीडिझाइन केलेले ग्रिल, उभ्या स्लॅट्ससह मस्क्यूलर बोनेट आणि मोठे एअर डॅम मिळतात. दुसरीकडे, टोयोटा इनोव्हा हायक्रॉस, बॉडी-ऑन-फ्रेम चेसिसवर बांधली गेली आहे. कारला स्लीक एलईडी डीआरएल, क्रोम गोलाकार हेक्सागोनल ग्रिल, मस्क्यूलर क्लॅमशेल बोनेट, रुंद एअर डॅम आणि सिल्व्हर स्किड प्लेट्ससह हेडलाईट्स मिळतात. 


इंजिन कसे आहे?


2022 Mahindra Scorpio-N ला 2.0-litre m-Stallion BS6 पेट्रोल इंजिन मिळते. हे इंजिन 200 hp ची कमाल पॉवर आणि 320 Nm चा पीक टॉर्क जनरेट करते. यात 2.2-लिटर m-Hawk डिझेल इंजिनचा पर्याय देखील मिळतो. टोयोटा इनोव्हा हायक्रॉसला 2.0-लिटर इनलाइन-फोर, TNGA पेट्रोल इंजिन आणि 2.0-लिटर, TNGA पेट्रोल-हायब्रिड पॉवरट्रेनसह दोन इंजिनांची निवड मिळेल. यात डायरेक्ट शिफ्ट सीव्हीटी गिअरबॉक्स मिळेल. 


ही वैशिष्ट्ये आहेत


या दोन्ही कारमध्ये ISOFIX पॉइंट्स, मल्टीफंक्शनल स्टीयरिंग व्हील, ड्युअल-टोन डॅशबोर्ड, सीटबेल्ट प्री-टेन्शनर, व्हर्टिकल एसी व्हेंट्स, ड्युअल फ्रंट एअरबॅग्ज, प्रीमियम लेदर अपहोल्स्ट्री, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल आणि सीट बेल्ट रिमाइंडर यांसारखी वैशिष्ट्ये आहेत. 
त्याच वेळी, टोयोटा हायक्रॉसला 10.1-इंच इन्फोटेनमेंट पॅनल आणि प्रगत ड्रायव्हिंग असिस्टन्स टेक्नॉलॉजी (ADAS) सारखी अतिरिक्त वैशिष्ट्ये मिळतील. Scorpio-N मध्ये 8-इंचाचे इन्फोटेनमेंट पॅनल उपलब्ध आहे. त्यात कोणताही ADAS सापडणार नाही. 


किंमत किती आहे?


Mahindra Scorpio-NK ची भारतीय बाजारपेठेतील (Z2 Petrol MT) एक्स-शोरूम किंमत 11.99 लाख रुपये आहे आणि त्याच्या शीर्ष मॉडेल Z8L डिझेल AMT ची एक्स-शोरूम किंमत 19.49 लाख रुपये आहे. तर, टोयोटा हायक्रॉसच्या किमती अद्याप सांगण्यात आलेली नाही. पण त्याची किंमत साधारण 16 ते 20 लाखांच्या दरम्यान असण्याची शक्यता आहे. 


महत्त्वाच्या बातम्या : 


Toyota Innova Hycross : टोयोटाने सादर केली त्यांची नवीन Innova Hycross MPV; भारतात कधी लॉन्च होणार? जाणून घ्या


Car loan Information:

Calculate Car Loan EMI