Ampere Magnus EX: देशात इलेक्ट्रिक वाहनांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अशातच अनेक वाहन उत्पादक कंपनी आपले नवीन इलेक्ट्रिक वाहन लॉन्च करत आहेत. यासोबतच आता अनेक कंपन्या आपले वाहन विक्रीसाठी नवनवीन योजना देखील आणत आहेत. यातच ग्रीव्ह इलेक्ट्रिक मोबिलिटीची (GEM)  शाखा असलेल्या Ampere EV ने आपल्या स्कूटरच्या विक्रीसाठी Flipkart सोबत करार केला आहे. याद्वारे कंपनी फ्लिपकार्टच्या माध्यमातून आपली Ampere Magnus EX इलेक्ट्रिक स्कूटर ऑनलाइन विकणार आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, या स्टेपमुळे ते अधिकाधिक ग्राहकांपर्यंत सहज पोहोचू शकतिल. तुम्हालाही ही इलेक्ट्रिक खरेदी करायची असेल तर आधी या स्कूटरबद्दल सविस्तर माहिती जाणून घ्या.


कंपनीच्या म्हणण्यानुसार, Ampere Magnus EX इलेक्ट्रिक स्कूटर एकदा चार्ज केल्यावर 80-100 किलोमीटरपर्यंत धावते. ही स्कूटर 5 रंगांच्या पर्यायांमध्ये सादर करण्यात आली आहे. सुरुवातीच्या टप्प्यात ही इलेक्ट्रिक स्कूटर कोलकाता, बेंगळुरू, पुणे आणि जयपूरमध्ये विकली जाईल. ग्राहक फ्लिपकार्टवरून ही स्कूटर ऑर्डर करू शकतात. या स्कूटरच्या ऑनलाइन बुकिंगवर तुम्हाला राज्यांनुसार सबसिडीचा लाभही मिळेल.


कशी कराल ऑर्डर? 


एका रिपोर्टनुसार, फ्लिपकार्टवर ऑर्डर दिल्यानंतर ग्राहकाला संबंधित डीलरकडून विमा, आरटीओ नोंदणी आणि स्कूटरची डिलिव्हरी याबाबत एक फोन कॉल येईल. यानंतर फ्लिपकार्ट पुढील 15 दिवसांत ही स्कूटर डिलिव्हरी करेल. फ्लिपकार्टवर या स्कूटरची किंमत 77249 रुपये ठेवण्यात आली आहे. याच्या खरेदीवर,बँक ऑफर अंतर्गत 10% पर्यंत सूट देखील मिळू शकते. तसेच नो कॉस्ट ईएमआयचा पर्यायही येथे उपलब्ध असेल.


कंपनीचे कार्यकारी संचालक आणि सीईओ संजय बहल म्हणतात की, कंपनीच्या स्थानिक अधिकृत डीलरशिपद्वारे फ्लिपकार्ट आणि कंपनीच्या इलेक्ट्रिक दुचाकींचे नेटवर्क देशाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात पोहोचले. फ्लिपकार्टच्या इलेक्ट्रॉनिक्स बिझनेस युनिटचे प्रमुख राकेश कृष्णन म्हणाले, “आम्ही आमच्या ग्राहकांना साधे आणि परवडणारे इलेक्ट्रिक स्कूटर आणण्यासाठी ग्रीव्हज इलेक्ट्रिक मोबिलिटीसोबत भागीदारी करण्यास अत्यंत उत्सुक आहोत.


Ampere Magnus EX इलेक्ट्रिक स्कूटर 1200 Watt च्या पॉवरफुल मोटरने चालते. याच्या लूक आणि फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, यात शक्तिशाली एलईडी हेडलाइट, रुंद सीट, अधिक लेगरूम जागा, कीलेस एंट्री, अँटी-थेफ्ट अलार्म, स्कूटर ट्रेकर यासह अनेक फीचर्स आहेत. या स्कूटरमध्ये काढता येण्याजोग्या बॅटरी आहे. जी तुम्ही सहजपणे बाहेर काढू शकता आणि घरी चार्ज करू शकता. 


महत्वाच्या बातम्या : 



Car loan Information:

Calculate Car Loan EMI