Ola S1: ओला इलेक्ट्रिकने अलीकडेच त्यांची S1 इलेक्ट्रिक स्कूटर भारतात लॉन्च केली आहे. आता कंपनी 1 सप्टेंबरपासून या स्कूटरच्या खरेदी विंडो उघडणार आहे. त्यानंतर ग्राहकांना ही स्कूटर खरेदी करता येणार आहे. Ola S1 इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत 99,999 रुपये (एक्स-शोरूम) आहे. ही स्कूटर गेल्या वर्षी लॉन्च झालेल्या Ola S1 Pro फ्लॅगशिप स्कूटरच्या प्लॅटफॉर्मवर तयार करण्यात आली आहे.


Ola S1 स्कूटरवर FAME-2 इलेक्ट्रिक व्हेइकल सबसिडी लागू केल्यानंतर, वेगवेगळ्या राज्यांमध्ये त्याची किंमत 1 लाख रुपयांपेक्षा कमी असेल. Ola S1 ई-स्कूटरच्या बुकिंगसाठी 499 रुपये आगाऊ रक्कम घेतली जात आहे. ओला इलेक्ट्रिकच्या अधिकृत वेबसाइटवरून स्कूटर बुक केली जाऊ शकते (https://book.olaelectric.com/).


स्कूटर रंग पर्याय 


मिळालेल्या माहितीनुसार, Ola S1 ची डिलिव्हरी 7 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. डिझाईनच्या बाबतीत, Ola S1 हे फ्लॅगशिप S1 Pro स्कूटर सारखीच दिसते. ही तीच डिझाईन प्लॅटफॉर्म शेअर करते. Ola S1 जेट ब्लॅक, लिक्विड सिल्व्हर, पोर्सिलेन व्हाईट, कोरल ग्लॅम आणि निओ मिंट या पाच रंगांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध करण्यात येणार आहे.


कंपनीचा दावा आहे की, Ola S1 इलेक्ट्रिक स्कूटरची ARAI प्रमाणित रेंज 141 किमी आहे. साधारणपणे रस्त्यावर, ही स्कूटर 128 किमीची रेंज सहज देऊ शकते. S1 प्रो प्रमाणेच S1 चालवण्‍याची मजा येईल, असे ओलाचे म्हणणे आहे. Ola S1 आणि S1 Pro 8.5kW (11.3 bhp) आणि 58 Nm टॉर्कच्या कमाल पॉवर आउटपुटसह समान हायपरड्राइव्ह इलेक्ट्रिक मोटर वापरण्यात आली आहे. Ola च्या दाव्यानुसार, S1 Pro चा टॉप स्पीड 95 km/h आहे. ज्यामुळे ही स्कूटर हायवेवर देखील सहज चालवता येते. ही स्कूटर केवळ 3.8 सेकंदात 0 ते 100 किमी/ताशी वेग पकडू शकते.


S1 चा टॉप स्पीड 95 किमी प्रतितास इतका मर्यादित आहे. तर S1 प्रोचा टॉप स्पीड 116 किमी प्रतितास आहे. ओलाचे म्हणणे आहे की नियमित चार्जरसह, S1 पूर्णपणे 4.5 तासांमध्ये चार्ज होऊ शकतो. तर S1 Pro पूर्ण चार्ज होण्यासाठी 6.5 तास लागतात. Ola S1 स्कूटरमध्ये MoveOS 3 ही लेटेस्ट ऑपरेटिंग सिस्टम अपडेट केली जात आहे. कंपनीचे म्हणणे आहे की, या अपडेटमध्ये ग्राहकांकडून मिळालेल्या फीडबॅकच्या आधारे ऑपरेटिंग सिस्टममध्ये बदल करण्यात आले आहेत. 


 


 


 


Car loan Information:

Calculate Car Loan EMI