Ioniq 5 Booking: प्रसिद्ध वाहन उत्पादक कंपनी Hyundai लवकरच भारतात आपली इलेक्ट्रिक कार Ioniq 5 लॉन्च करणार आहे. तत्पूर्वी कंपनी जानेवारी 2023 मध्ये होणाऱ्या ऑटो एक्सपोमध्ये ही कार सादर करू शकते. या कारचे बुकिंग 20 डिसेंबरपासून सुरू होणार आहे. या कारमध्ये ग्राहकांना अनेक नवीन फीचर्स मिळणार आहे. या कारबद्दल अधिक माहिती जाणून घेऊ.


Ioniq 5 ह्युंदाईच्या नवीन डिझाइन आणि लूकवर आधारित आहे. यात एलईडी हेडलॅम्प आणि सरफेसिंगसह पॅरामेट्रिक डिझाइन एलिमेंट आहेत. या कारमध्ये जास्त रेंज मिळण्याची अपेक्षा आहे. याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. Ioniq5 मध्ये काचेचे छप्पर मिळू शकते. यासोबतच याला टिकाऊ इंटीरियरही मिळेल. यामध्ये बायो पेंटचा वापर करण्यात आला आहे. याचे हेडलाइन फॅब्रिक्स आणि कार्पेट्ससह इको-प्रोसेस्ड लेदरसह इंटिरिअर्स बनवले गेले आहेत. Ioniq 5 ला मूव्हेबल सेंटर कन्सोलसह मॉड्यूलर इंटीरियर देखील मिळेल. तसेच या ईव्हीसाठी फ्लॅट फ्लोअर प्लॅटफॉर्मचा वापर करण्यात आला आहे. यामध्ये ड्युअल स्क्रीनसोबतच अनेक नवीन तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेले अनेक फिचर्सही पाहता येतील.


Ioniq5 ही ई-जीएमपी प्लॅटफॉर्मवर विक्रीसाठी तयार केलेली पहिली कार असेल. कोना नंतर भारतातील कंपनीसाठी दुसरी ईव्ही असेल. कंपनीची कोना ही भारतातील पहिली EV SUV होती. जागतिक बाजारपेठेत Ioniq 5 58 kWh आणि 72.6 kWh सह दोन बॅटरी पॅकसह येतो. भारतात असताना ती एकाच मोटर लेआउटसह येण्याची शक्यता आहे. रेंजबद्दल बोलायचे झाल्यास, ही कार 400 किमी पेक्षा जास्त रेंज देण्यास सक्षम असेल. Ioniq 5 भारतीय बाजारपेठेत BYD Atto3 आणि Volvo XC40 Recharge EVs शी स्पर्धा करेल.


कोणाशी होणार होणार स्पर्धा?


ही कार Volvo XC40 रिचार्जशी स्पर्धा करेल. ही कार 78 kWh बॅटरी पॅकद्वारे समर्थित आहे. जे 402bhp चे जास्तीत जास्त पॉवर आउटपुट आणि 660Nm टॉर्क जनरेट करते. एका चार्जवर याला 418 किलोमीटरची रेंज मिळते. 150kW DC फास्ट चार्जरच्या मदतीने याचा बॅटरी पॅक 28 मिनिटांत 10-80 टक्के चार्ज होऊ शकतो.


इतर ऑटो संबंधित बातमी: 


Tata Blackbird : टाटा घेऊन येत आहे 'ब्लॅकबर्ड' नावाची आणखी एक जबरदस्त कार, ह्युंदाईच्या क्रेटाला देणार टक्कर


Car loan Information:

Calculate Car Loan EMI