Bike Care Tips : दुचाकी वाहन हे भारतातील सर्वाधिक वापरले जाणारे वाहन आहे. ज्यामध्ये स्कूटरपेक्षा बाईक (Bike) चालवणाऱ्यांची संख्या आपल्याला जास्त पाहायला मिळते. अशा वेळी तुमच्या बाईकची काळजी घेणं तुमच्यासाठी फार महत्त्वाचं आहे. अशा वेळी बाईकची साखळी सांभाळणे अधिक महत्त्वाचे आहे. कारण बाईकच्या चाकांना गती देण्याचं काम तुमच्या वाहनाच्या साखळीवरच अवलंबून असते. 


या ठिकाणी आम्ही तुम्हाला काही सोप्या टिप्सबद्दल सांगणार आहोत, ज्याचा वापर करून तुम्ही तुमच्या बाईकची चांगली काळजी घेऊ शकता. जेणेकरून तुम्हाला बाईक चालवताना कोणताही अडथळा येणार नाही. आणि तुम्ही तुमच्या ठराविक ठिकाणापर्यंत वेळेत पोहोचू शकाल.


बाईक अधूनमधून चेक करा 


दैनंदिन जीवनात तुम्हाला जेव्हाही वेळ मिळेल तेव्हा तुमच्या बाईकच्या साखळीची नक्कीच तपासणी करा. यासाठी तुम्हाला तुमची बाईक एका सपाट जागेवर डबल स्टँडवर पार्क करावी लागेल. जेणेकरून चाक फिरवून संपूर्ण साखळी सहज पाहता येईल आणि त्यात काही अडचण असेल तर तीही सहज पाहता येईल. त्याला तपासता येईल. 


साखळी स्वच्छ करा 


जर बाईकच्या साखळीवर घाण किंवा धूळ दिसत असेल तर ते स्वच्छ करण्यासाठी तुम्ही चांगला क्लिनर किंवा पाण्यात डिटर्जंट काही प्रमाणात वापरू शकता. तुम्ही साखळी स्वच्छ करण्यासाठी ब्रशचा वापर करू शकता. ज्याद्वारे तुम्ही साचलेली माती, धूळ, घाण अगदी सहज स्वच्छ करू शकाल. 


स्वच्छ कापडाने पुसून टाका 


बर्‍याच वेळा मेकॅनिक किंवा स्वतःही बाईक पाण्याने धुतल्यानंतर लगेचच साखळीवर वंगण लावतात. जे खरंतर चुकीचे आहे. बाईकची साफसफाई केल्यानंतर, साखळी व्यवस्थित साफ करणे फार महत्वाचे आहे. जेणेकरून त्यातून पाणी पूर्णपणे काढून टाकले जाईल, तरच त्यावर वंगण लावा. यासाठी चाक हळूहळू फिरत राहणे आणि त्याच प्रमाणात साखळीवर वंगण घालणे हा एक चांगला मार्ग आहे. जेणेकरून ते संपूर्ण साखळीवर व्यवस्थित बसेल. संपूर्ण साखळीवर वंगण लावल्यानंतर, चाक आणखी दोन-चार वेळा फिरवा. जेणेकरून ती संपूर्ण साखळीशी व्यवस्थित जोडली जाईल आणि तुमची बाईक तुम्हाला तुमच्या ठराविक ठिकाणापर्यंत घेऊन जाण्यासाठी पुन्हा सज्ज होईल. यासाठी आठवड्यातून एकदा तुम्ही तुमच्या बाईकची, तसेच साखळीची काळजी घेणं गरजेचं आहे. 


महत्त्वाच्या बातम्या :


Auto News : पॉवरफुल इंजिन आणि आकर्षक लूकसह नवीन TVS Apache अनेक वैशिष्ट्यांसह लॉन्च; किंमत 1.35 लाखांपासून सुरुवात


Car loan Information:

Calculate Car Loan EMI