TVS Apache RTR Bike Launched In India : दिग्गज कार निर्माता कंपनी टीवीएस मोटर्सने (TVS Motors) ग्राहकांसाठी नेहमीच नवीन बाईक घेऊन येत असते. अशीच एक मजबूत आणि परवडणारी स्पोर्ट्स बाईक नुकतीच लॉन्च करण्यात आली आहे. TVS Apache असं या बाईकचं नाव असून हे RTR 160 असं या नवीन मॉडेलचं नाव आहे. कंपनीने या बाईकला मोटोसोल इव्हेंट दरम्यान लॉन्च केलं आहे. आकर्षक लूक आणि दमदार इंजिन असलेल्या या बाईकची सुरुवातीची एक्स शोरूम किंमत 1.35 लाख इतकी आहे.
लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी आहे की, Apache RTR 160 4V ला कंपनीने फक्त एक पेंट स्किम लाईटिंग ब्लू मध्ये लॉन्च केलं आहे. या स्पोर्टी बाईकमध्ये मॅकेनिकल आणि फीचर्स अपडेट करण्यात आले आहेत. ज्यामुळे या बाईकला अधिक आकर्षक लूक येतो. या बाईकमध्ये कंपनीने ड्युअल चॅनेल एन्टी लॉक ब्रेकिंग सिस्टीमबरोबरच तीन वेगवेगळे ड्रायव्हिंग मोड्स देण्यात आले आहेत. यामुळे तुमचा रायडिंग अनुभव अधिक शानदार होईल यात शंकाच नाही.
या बाईकमध्ये कंपनीने मोठ्या साईजचे (240 मिमी) चा रियर डिस्क ब्रेक दिला आहे. जो तुम्ही वेगाने जरी बाईक चालवली तरीही ब्रेक लावण्यासाठी अत्यंत सुरक्षित आहे. या बाईकमध्ये ट्रेडिशनल स्मार्ट कनेक्ट टेक्निक देण्यात आलं आहे. याशिवाय या स्पोर्टी बाईकमध्ये एलईडी हेडलाईट्स डेटाईम लर्निंग लाईट्सचाही समावेश करण्यात आला आहे.
SmartConnect चं वैशिष्टय काय?
अर्बन, रेन आणि स्पोर्टच्या रायडिंग मोड्समुळे बाईक पूर्वीपेक्षा अधिक चांगली झाली आहे. TVS सेगमेंट फर्स्ट फीचर म्हणून राईड मोड्स देत आहे. ही बाईक जे विकत घेतील अशा ग्राहकांच्या स्मार्टफोनला ब्लूटूथ कनेक्ट करून कॉलर आयडी एसएमएस नोटिफिकेशन, नेव्हिगेशन असिस्ट, लास्ट पार्क लोकेशन, क्रॅश अलर्ट आणि सर्व्हिस बुकिंग यांसारखी वैशिष्ट्ये मिळतात. SmartXonect आणि इतर टू-व्हिलरसह सादर केले गेले आहे. या बाईकमध्ये व्हॉईस असिस्ट फिचर देखील मिळतात. ज्याद्वारे वापरकर्ते फक्त एका आवाजाने अॅपद्वारे बाईकची काही वैशिष्टये ऑपरेट करू शकतील.
महत्त्वाच्या बातम्या :
Hyundai Creta Facelift : आगामी Hyundai Creta Facelift आता अधिक सुरक्षित असणार; लेव्हल-2 ADAS मिळणार
Car loan Information:
Calculate Car Loan EMI