CNG Cars Comparison : देशात सीएनजी कारचे अनेक मॉडेल्स उपलब्ध आहेत आणि त्यांची मागणीही खूप जास्त आहे, कारण त्या पारंपारिक इंधनावर चालणाऱ्या कारच्या तुलनेत खूपच कमी खर्चात धावतात. मारुती सेलेरियो, ह्युंदाई सॅन्ट्रो आणि मारुती वॅगनआर सारख्या कार देशात CNG मॉडेल्समध्ये मोठ्या प्रमाणात विकल्या जातात. या कार चालविण्यास किफायतशीर तसेच परवडणाऱ्या किमतीतही उपलब्ध आहेत. तुम्हालाही यापैकी कोणतीही सीएनजी कार घ्यायची असेल? परंतु कोणती खरेदी करायची हे ठरवता येत नसेल, तर या तीन कारची तुलना पाहा, ज्यामुळे तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय निवडणे तुमच्यासाठी सोपे होईल. जाणून घेऊया या गाड्यांची खासियत


Maruti Celerio CNG 
महागड्या पेट्रोल डिझेलच्या युगात ही कार प्रवासासाठी अतिशय किफायतशीर पर्याय आहे कारण ही कार 35.6 किमी/कि.ग्रॅ.चे सर्वोत्तम मायलेज देते. मारुतीच्या या कारमध्ये 998 सीसी इंजिन वापरण्यात आले आहे, जे 57 एचपी पॉवर आणि 82.1 एनएम कमाल टॉर्क जनरेट करू शकते. दिल्लीच्या एक्स-शोरूममध्ये या कारची किंमत 6.69 लाख रुपये आहे.


Hyundai Santro CNG
Hyundai Santro मध्ये 1.1-लिटर इंजिन आहे जे 60 PS कमाल पॉवर आणि 85 Nm पीक टॉर्क निर्माण करते. या कारमधून 30.48 किमी/किलो मायलेज मिळू शकते. ही कार दोन प्रकारात बाजारात उपलब्ध आहे. CNG Magna प्रकाराची एक्स-शोरूम किंमत 6.10 लाख रुपये आहे आणि CNG Sportz ची एक्स-शोरूम किंमत 6.42 लाख रुपये आहे.


Maruti WagonR CNG 
मारुतीची वॅगन आर ही देशातील सर्वाधिक विकली जाणारी कार आहे. यात 1.0 लीटर इंजिन आहे जे 58 hp ची टॉप पॉवर आणि 78 Nm कमाल टॉर्क जनरेट करू शकते. या 5-सीटर कारमधून 32.52 किमी/किलो मायलेज मिळेल असा कंपनीचा दावा आहे. या सीएनजी कारची दिल्ली एक्स-शोरूममध्ये किंमत 6.42 लाख ते 6.86 लाख रुपये आहे.


महत्वाच्या बातम्या : 



 


 


Car loan Information:

Calculate Car Loan EMI