Best Cars with Air Purifier: देशातील अनेक शहरांमध्ये वायू प्रदूषण (Best Cars with Air Purifier) शिगेला पोहोचले आहे. सध्या दिल्लीचा हवा गुणवत्ता निर्देशांक 400 च्या पुढे गेला आहे. दिल्लीच्या आजूबाजूच्या भागांनाही याचा मोठा फटका बसला आहे. घरात राहून प्रदूषण टाळण्यासाठी लोक एअर प्युरिफायरचा वापर करतात. पण काही कामानिमित्त घराबाहेर पडावे लागते आणि अनेकदा गाड्यांमध्ये  Air Purifierची सुविधा मिळत नाही. त्यामुळे प्रदूषणाची गंभीर समस्या लक्षात घेता आम्ही तुम्हाला इनबिल्ट  Air Purifier मिळणाऱ्या टॉप 5 कारबद्दल सांगणार आहोत. 


1. Hyundai Exter (ह्युंडाई एक्सेटर)


Hyundai Exterच्या टॉप मॉडेलमध्ये म्हणजेच SX मॉडेलमध्ये कंपनी Air Purifier  फीचर देते. याची सुरुवातीची किंमत 8 लाख 64 हजार रुपये आहे. एंट्री लेव्हल EX, S, SX, SX(O) आणि टॉप-स्पेक  SX(O), कनेक्टेड कार टेक्नॉलॉजीसह पाच व्हेरियंट उपलब्ध असतील.


2.  Kia Sonet  (किआ सोनेट)


 Kia Sonet मध्ये इन-बिल्ट Air Purifier असून सेंटर आर्मरेस्टवर एक्यूआय डिस्प्ले देण्यात आला आहे. इन-बिल्टAir Purifier सह ही आपल्या सेगमेंटमधील सर्वात परवडणारी XUV आहे. किआ सोनेटची किंमत 6.79 लाख रुपयांपासून सुरू होते आणि 13.25 लाख रुपयांपर्यंत जाते.  


3. Tata Nexon (टाटा नेक्सॉन)


Tata Nexonचे नवे मॉडेल नुकतेच लाँच करण्यात आले आहे. याच्यात  Air Purifier देखील आहे, जो डस्ट सेन्सरसह येतो. ही सबकॉम्पॅक्ट एसयूव्हीच्या टॉप-स्पेक फियरलेस व्हेरियंटमध्ये तयार करण्यात आली आहे .ज्याची किंमत 12.50 लाख रुपये पासून सुरू होते.


4. Hyundai Creta  (ह्युंडाई क्रेटा) 


 Hyundai Creta ही देशातील सर्वाधिक विकली जाणारी SUV गाडी आहे. यातही आपल्या सुरक्षिततेची आणि आरामाची पूर्ण काळजी घेण्यात आली आहे. प्रदुषण टाळण्यासाठी क्रेटामध्ये Air Purifier ही आहे. कॉम्पॅक्ट SUV मध्ये हे फीचर SX व्हेरियंटमध्ये देण्यात आले आहे, ज्याची किंमत 14.81 लाख रुपयांपासून सुरू होते. 


5.  Hyundai Venue(ह्युंडाई वेन्यू)


Hyundai Venueमध्ये बिल्ट-इन Air Purifier  देण्यात आले आहे, ज्याला कार ऑटो हेल्दी एअर प्युरिफायर म्हणते. हे फीचर सबकॉम्पॅक्टSUVच्या SX (0) ट्रिममध्ये येते.  12 लाख रुपये या गाडीची किंमत आहे. 


या सगळ्या कारमध्ये नवनवे फिचर्स लॉंच केले गेले आहेत. त्यासोबतच कमी किमतीत सगळे चांगले फिचर्स मिळणाऱ्या कारपैकी या पाच कार आहे. त्यामुळे भविष्यात कार घेण्याचा विचार करत असाल तर या पाच कार नक्की निवडू शकता. 


इतर महत्वाची बातमी-


Smartwatch Features : Smartwatch खरेदी करताय? जरा थांबा, या 5 गोष्टी आधी चेक करा, नाहीतर सगळे पैसे पाण्यात गेले म्हणून समजा!


Car loan Information:

Calculate Car Loan EMI