Ola  Electric scooter : भारतीय बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात ओलाच्या इलेक्ट्रिक स्कूटर्स (Electric scooter)  विकल्या जात आहेत. आज आम्ही तुम्हाला Ola S1 च्या 2 kW आणि 3 kW संदर्भातील सविस्तर माहिती पाहणार आहोत. इलेक्ट्रिक स्कूटरला वित्तपुरवठा करण्याच्या ट्रेंडला वेग आला आहे. लोक काही हजार रुपयांचे डाऊन पेमेंट करून आपली इच्छित स्कूटर घरी आणतात. त्यानंतर उरलेली रक्कम हप्त्यांमध्ये भरतात. अशा परिस्थितीत, जे Ola S1 देखील काही पैसे भरुन आपण खरेदी करु शकतो. 


 एकदा चार्ज केल्यानंतर 95 किलोमीटरपर्यंत प्रवास 


Ola च्या सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर Ola S1 X 2 kW व्हेरियंटची शोरूम किंमत आहे 89,999 रुपये आहे. तर ऑन-रोड किंमत 94,878 रुपये आहे. ही स्कूटर एकदा चार्ज केल्यानंतर 95 किलोमीटरपर्यंत चालवता येते. तिचा टॉप स्पीड 85 किलोमीटर प्रति तास इतका आहे. 


पाहुयात फायनान्‍स डिटेल्स 


जर तुम्‍ही 20 हजार रुपयांच्‍या डाऊन पेमेंटसह या प्रकाराला फायनान्स केले तर तुम्हाला 74,878 रुपयांचे कर्ज घ्यावे लागेल. जर तुम्ही या स्कूटरला 9 टक्के व्याजदराने 3 वर्षांसाठी वित्तपुरवठा केला तर तुम्हाला पुढील 36 महिन्यांसाठी मासिक हप्ता म्हणून 2,381 रुपये द्यावे लागतील. या स्कूटरवर सुमारे 11 हजार रुपये व्याज आकारले जाणार आहे. Ola S1X च्या 3 kW प्रकारची शोरूम किंमत 99,999 रुपये आहे. ऑन-रोड किंमत ही 1,05,057 रुपये आहे. ओलाच्या या परवडणाऱ्या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये 151 किलोमीटरपर्यंत सिंगल चार्जिंग रेंज आणि 90 किमी प्रतितास इतका टॉप स्पीड आहे. 


फायनान्स पर्यायांबद्दल बोलायचे झाल्यास, जर तुम्ही 20 हजार रुपयांच्या डाऊन पेमेंटसह वित्तपुरवठा केला तर तुम्हाला 85,057 रुपये कर्ज घ्यावे लागेल. जर कर्जाचा कालावधी 3 वर्षांपर्यंत असेल आणि व्याज दर 9 टक्क्यांपर्यंत असेल, तर तुम्हाला पुढील 3 वर्षांसाठी दरमहा 2,705 रुपये हप्ता म्हणून भरावे लागतील. Ola S1 ला वित्तपुरवठा करण्यावर आम्ही तुम्हाला येथे सांगतो की ओला इलेक्ट्रिक स्कूटरला वित्तपुरवठा करण्यापूर्वी, तुम्ही प्रथम शोरूममध्ये जा आणि सर्व तपशील मिळवा.


महत्त्वाच्या बातम्या:


Electric Car : टेस्लाची इलेक्ट्रिक कार दिसणार भारतीय रस्त्यांवर, लवकरच होणार घोषणा, कारची किंमत किती? 


Car loan Information:

Calculate Car Loan EMI