MS Dhoni Buys Kia EV6: भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीला कार आणि बाईकचा मोठा शौकीन आहे. त्याला अनेकदा महागड्या कार आणि बाईक चालवताना पाहिलं गेलं आहे. त्याच्या कार कलेक्शनमध्ये अनेक महागड्या कार आणि बाईक आहेत. आता या कलेक्शनमध्ये त्याने आणखी एका कारचा समावेश केला आहे. एका रिपोर्टनुसार, महेंद्र सिंह धोनीने नवीन इलेक्ट्रिक कार Kia EV6 खरेदी केली आहे. या कारसोबतचे त्यांचे फोटो व्हायरल होत आहेत. त्याची ही पहिली इलेक्ट्रिक कार आहे. ही कार एका चार्जवर 700 किलोमीटरपर्यंत धावू शकते, असा दावा कंपनीने केला आहे.


ट्विटरवर ट्रेंड होत असलेल्या एका व्हिडीओमध्ये, महेंद्र सिंह धोनी त्याच्या नवीन इलेक्ट्रिक कार EV6 मध्ये रुतुराज गायकवाड आणि केदार जाधव यांच्यासह बसलेला दिसत आहे. या नवीन कारवर टीसी नोंदणी क्रमांक दिसत आहे. कंपनी सीबीयू मार्गाने ही कार भारतात आयात करते. त्यापैकी आतापर्यंत फक्त 200 युनिट्स भारतात आले आहेत. या सर्व कार विकल्या गेल्या आहेत. या कारचे आणखी युनिट्स लवकरच देशात आयात केले जाणार आहेत.


किती आहे किंमत? 


Kia च्या या इलेक्ट्रिक कारचे दोन प्रकार बाजारात उपलब्ध आहेत. एका व्हेरियंटची एक्स-शोरूम किंमत 59.95 लाख रुपये आहे. ज्यामध्ये फ्रंट-माउंटेड सिंगल मोटरसह टू-व्हील-ड्राइव्ह कॉन्फिगरेशन दिले गेले आहे. ही मोटर 229 पीएस पॉवर आणि 350 Nm टॉर्क जनरेट करते. तर इतर व्हेरियंटमध्ये ऑल-व्हील-ड्राइव्ह सिस्टम आहे. त्याची मोटर 325 पीएस पॉवर आणि 605 एनएम टॉर्क जनरेट करते. या व्हेरियंटची एक्स-शोरूम किंमत 64.95 लाख रुपये आहे.


Kia EV6 मध्ये 77.4 kWh चा बॅटरी पॅक मिळतो. जो एका चार्जवर 708 किलोमीटरपर्यंत चालवता येतो. ही कार 350kW DC फास्ट चार्जरसह 10-80% चार्ज होण्यासाठी फक्त 18 मिनिटे घेते. याशिवाय महेंद्र सिंह धोनीकडे इतरही अनेक आलिशान कार आहेत, ज्यात जीप ग्रँड चेरोकी ट्रॅकहॉक, लँड रोव्हर, मर्सिडीज-बेंझ जीएलई, ऑडी क्यू7 सारख्या कारचा समावेश आहे. दरम्यान, अलीकडेच धोनी Yamaha RD 350 बाईक चालवताना दिसला होता. या वर्षाच्या सुरुवातीला त्याने त्याच्या कलेक्शनमध्ये Yamaha RD350 LC चा समावेश केला आहे. हे बाईक चंदीगड येथील ब्लू स्मोक कस्टम्सची रिस्टोअर केलेली Yamaha RD350LC आहे. 


संबंधित बातमी: 


Yamaha RD350 चालवताना दिसला धोनी, जुने मॉडेल केले रिस्टोअर


Car loan Information:

Calculate Car Loan EMI