Bajaj Platina 100 Mileage Per Liter: भारतात मायलेज बाईक खूप पसंत केल्या जातात. हेच कारण आहे की, देशात मायलेज बाईकला मोठी मागणी असून याची विक्रीही वाढत आहे. अशातच आज आम्ही तुम्हाला देशातील सर्वात बेस्ट मायलेज बाईकबद्दल सांगणार आहोत. ही बाईक आहे दुचाकी उत्पादक कंपनी बजाजची Platina 100. बजाज प्लॅटिना (bajaj platina 100) आपल्या मायलेजमुळे नेहमीच चर्चेत असते. या बाईकने यावेळी पेट्रोल टाकी फुल केल्यावर 700 किलोमीटरचा प्रवास करून मायलेजचा नवीन विक्रम केला आहे. 


या बाईकची इंधन टाकीची क्षमता 11.50 लीटर इतकी आहे. कंपनीने सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. या पोस्टनुसार, प्लॅटिनाला (platina 100) जगातील सर्वात उंचीवर असलेल्या रस्त्यावर चालवण्यात आली. सुमारे 5800 मीटर उंचीवर असलेल्या कीलॉन्ग ते उमलिंग ला पास पर्यंत ही बाईक चालवण्यात आली आहे.


या बाईकच्या जबरदस्त मायलेजमुळे बाजारात याची मोठ्या प्रमाणात विक्री देखील होते. तुम्हीही ही बाईक खरेदी करायचा विचार करत असल्यास आज आम्ही तुम्हाला या बाईकचे फीचर्स, मायलेज आणि किंमतीबद्दल माहिती सांगणार आहोत. या बाईकच्या फीचर्सबद्दल बोलायचं झालं तर यामध्ये ग्राहकांना ABS ब्रेकिंग टेक्नॉलॉजी मिळते. कंपनीने बाईकची प्रारंभिक किंमत 64,653 रुपयांपासून (एक्स-शोरूम) सुरु होते. य बाईकच्या सेगमेंटमध्ये यात सर्वोत्तम ब्रेकिंग फीचर ग्राहकांना मिळणार. यामुळे अचानक ब्रेक दाबल्या राइडरला परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यास मदत होते. या बाईकला डिस्क ब्रेकसह चांगला लूक मिळतो.


इंजिन 


या बाईकमध्ये ग्राहकांना आरामदायी सीट,  नायट्रोक्स स्प्रिंग-ऑन-स्प्रिंग सस्पेंशन आणि ट्यूबलेस टायर मिळणार. याच्या मदतीने तुमचा लांब पल्ल्याचा प्रवास सुलभ आणि सहज होण्यास मदत होईल.  या बाईकमध्ये ग्राहकांना 102cc क्षमतेचा फोर-स्टोक, DTS-i, सिंगल सिलेंडर मिळते. जे .9 PS पॉवर आणि 8.3 न्यूटन मीटर टॉर्क जनरेट करते. या बाईकची टॉप स्पीड ताशी 90 किलोमीटर आहे. तसेच याचे वजन 117 किलो आहे. याचा ग्राउंड क्लीयरन्स 200 मिमी इतका आहे, जो भारतीय रस्त्यांसाठी चांगला आहे. याची लांबी 2006 मिमी, रुंदी 713 मिमी आणि उंची 1100 मिमी आहे. ही बाईक कॉम्बो कलर पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. ज्यामध्ये  ब्लॅक आणि रेड, ब्लॅक आणि सिल्व्हर, ब्लॅक आणि गोल्ड आणि ब्लॅक आणि ब्लू यांचा समावेश आहे. भारतीय बाजारात या बाईकची स्पर्धा TVS Star City Plus, Honda Dream Neo आणि Hero MotoCorp HF Deluxe शी आहे.


 



     


Car loan Information:

Calculate Car Loan EMI