Car Year End Offers : काही दिवसांत 2024 हे वर्ष सुरू  (Auto News) होणार आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी ऑफर्स सुरु आहेत त्यात कारवर मोठ्या ऑफर्स मिळत आहे. ऑटो कंपन्या आणि डीलरशिपला आजकाल न विकल्या गेलेल्या मॉडेल्सचा स्टॉक रिकामा करायचा आहे. यासाठी ऑटो ब्रँड्स दमदार डिस्काउंट ऑफर्स देत आहेत. नवी कार खरेदी केल्यास तुम्ही 11.85 लाख (Year Ender 2023)  रुपयांपर्यंत बचत करू शकता. एकंदरीत जर तुम्हाला नवीन कार खरेदी करायची असेल तर तुमच्यासाठी ही उत्तम संधी आहे. जवळपास सर्वच मोठ्या कार कंपन्या डिस्काउंट ऑफर्स देत आहेत. मारुती सुझुकीपासून टाटा मोटर्स, ह्युंदाई, महिंद्रापर्यंत कार खरेदीवर मोठी बचत होईल. यावेळी तीन कार घेऊन आलो आहोत, ज्यावर लाखो रुपयांची सूट मिळत आहे. चला तर मग पाहूया कार डिटेल्स आणि ऑफर्स...



तीन एसयूव्हीवर बंपर सूट डिसेंबर 2023 मध्ये या तिन्ही एसयूव्हीवर दमदार डिस्काउंट ऑफर्स मिळत आहेत.2024 सुरु झाल्यावर हे  ऑफर्स मिळणार नाही आहे. त्यामुळे जर कार खरेदी करायची असेल ही सुवर्णसंधी आहे. 



जीप ग्रँड चेरोकी एसयूव्ही (Jeep Grand Cherokee SUV)


 जीपची फ्लॅगशिप एसयूव्ही ग्रँड चेरोकीवर सर्वाधिक सूट मिळत आहे. जर तुम्ही ही कार खरेदी केली तर तुम्हाला 11.85 लाख रुपयांपर्यंत सूट मिळेल. या एसयूव्हीची एक्स शोरूम किंमत 80,50,000 रुपये आहे. भारतात हे मॉडेल पेट्रोल इंजिनसह उपलब्ध आहे. यात फक्त ऑटोमॅटिक गिअरबॉक्स मिळेल.


फोक्सवॅगन टिगुआन  (Volkswagen Tiguan)


तुम्हाला फोक्सवॅगनची आलिशान एसयूव्ही खरेदी करायची असली तरी तुम्हाला मोठी सूट मिळणार आहे. त्याची टॉप रेंज एसयूव्ही टिगुआनवर 4.2 लाख रुपयांपर्यंत सूट मिळत आहे. कंपनी तुम्हाला कॅश डिस्काउंट, एक्सचेंज बोनस आणि कॉर्पोरेट बेनिफिट्सच्या माध्यमातून ही सूट देणार आहे. याशिवाय 4 वर्षांचे सर्व्हिस पॅकेज आणि इतर बेनिफिट्सही मिळणार आहेत. या कारची एक्स शोरूम किंमत 35.16 लाख रुपयांपासून सुरू होते.


महिंद्रा एक्सयूवी400 ईव्ही  (Mahindra XUV400 EV) 


जर तुम्ही इलेक्ट्रिक कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर महिंद्रा एक्सयूव्ही 400 पाहू शकता. कंपनीची ही एकमेव इलेक्ट्रिक एसयूव्ही आहे, ज्याच्या खरेदीवर 4.2 लाख रुपयांपर्यंत सूट मिळणार आहे. ही सूट त्याच्या टॉप-मोस्ट व्हेरियंट ईएलवर मिळणार आहे. एक्सयूव्ही 400 ची एक्स-शोरूम किंमत 15.99 लाख रुपयांपासून सुरू होते.


इतर महत्वाची बातमी-


Year Ender 2023 : यावर्षी 'या' 10 फेसलिफ्ट कार्सना मिळाली सर्वाधिक पसंती; Tata Nexon आणि BMW चाही समावेश


 

 

Car loan Information:

Calculate Car Loan EMI