Maruti Alto K10 vs Renault Kwid : देशात सध्या वेगवेळ्या प्रकारच्या कार उपलब्ध आहेत. काही कारच्या मॉडल्स खूप महाग तर काही स्वस्त असल्याचे पाहायला मिळतात. मात्र, देशात स्वस्त कार्सच्या मागणीत कधीही घट झालेली नाही. अशातच तुम्ही जर छोटी आणि स्वस्त कार खरेदी करण्याचा विचार करत असाल आणि तुमचे बजेट पाच लाख रुपयांपेक्षा कमी आहे तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. या किंमतीमध्ये तुम्हाला दोन प्रकारच्या कार मिळतील. यामध्ये मारुती  सुझुकी ऑल्टो के 10 (Maruti Alto k10) रेनॉल्ट क्विड (Renault Kwid) यांचा समावेश आहे. या गाड्यांबद्दल माहिती जाणून घेऊया.


गाड्यांच्या किंमतीची तुलना


कार खेरदी करताना सर्वात आधी बजेटचा विचार केला जातो. यासोबत गाड्यांच्या एकापेक्षा जास्त ऑप्शनचा शोध घेतला जातो. त्यामुळे कार खरेदी करताना त्यांच्यातील फीचर्समधील फरक कळण्यास मदत होते. अशातच मारुती सुझुकी ऑल्टो के 10 ही कार एसटीडी(ओ), एलएक्सआय, व्हीएक्सआय आणि व्हीएक्सआय प्लस यासारख्या चार सेगमेंटमध्ये उपलब्ध असणार आहे. तसेच या गाड्यांची एक्स शो रुम प्राईझ 3.99 लाख रु. ते 5.95 लाख रुपयांच्या रेंजमध्ये उपलब्ध आहे.


तर दुसरीकडे रेनॉल्ट क्विडच्या गाड्यांमध्ये आरएक्सई, आरएक्सएल, आरएक्सएल(ओ) आणि क्लाईंबरसारखे पाच सेगमेंट उपलब्ध असून कारची एक्स शो रुम प्राईझ 4.70 लाख रुपये ते 6.33 लाख रुपये या रेंजमध्ये उपलब्ध असणार आहे. 


या गाड्यांचे मायलेज काय आहे? 


ऑल्टो के 10 पेट्रोल एमटी सिस्टीसह 1 लिटर पेट्रोलमध्ये 24.39 किमीपर्यंत धावते, तर पेट्रोल एएमटीवर याचा मायलेज प्रति लिटर 24.90 किमी इतका आहे. सीएनजीवर ही गाडी प्रती किलो 33.85 किमी मायलेज देते. तर दुसरीकडे रेनॉल्ट क्विडमध्ये मॅन्युअल ट्रान्समिशनसह  22.3 kmpl आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशनमध्ये 21.46kmpl इतका मायलेज मिळतो.


दोन्ही गाड्यांच्या फीचर्सवर नजर


ऑल्टो के10 मध्ये अॅपल कार प्ले आणि अँड्रॉईड ऑटोसह उपलब्ध आहे. यासोबत 7 इंचचा टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टीम, की-लेस एन्ट्री आणि एक डिजिटलाईज्ड इंस्ट्रूमेंट क्लस्टर, स्टिअरिंग-माऊटेड कंट्रोल यासारखे फीचर्स आहे. या कारमध्ये चालक-प्रवाशांच्या सुरक्षेसाठी ड्युएल एअरबॅग, ईबीडीसोबत एबीएस आणि रिअर पार्किंग सेंसरसारख्या सेफ्टी फिचर्स आहेत.


या रंगांमध्ये कार मिळणार


मारुतीने ऑल्टो के 10 हॅचबॅक सहा मोनोटोनच्या शेड्समध्ये उपलब्ध करुन दिली आहे. यामध्ये मेटॅलिक सिजलिंग रेड, मेटॅलिक सिल्की सिल्वर, मेटॅलिक ग्रॅनाइट ग्रे, मेटॅलिक स्पीडी ब्लू, प्रीमियम अर्थ गोल्ड आणि सॉलिड व्हाईट या रंगांचे पर्याय गाडीमध्ये उपलब्ध करुन दिलेले आहेत. त्यामुळे ज्यांनी स्वस्त कारचा शोध सुरु केला आहे. त्यांच्यासाठी या कार बजेटमधील आणि चांगला ऑप्शन ठरु शकतात.


तर रेनॉल्ट क्विड, छह मोनोटोन आणि दो ड्यूएल-टोन शेड्समध्ये उपलब्ध आहे. यामध्ये आईस कूल व्हाईट, मेटल मस्टर्ड, फायरी रेड, आऊटबॅक ब्रॉन्ज, मूनलाइट सिल्वर, जांस्कर ब्लू, ब्लॅक रुफसह आईस कूल व्हाईट आणि ब्लॅक रुफसह मेटल मस्टर्डचा समावेश आहे.


Car loan Information:

Calculate Car Loan EMI