Upcoming Citroen Car : Citroen कंपनीने गेल्या वर्षी भारतीय बाजारपेठेत Citroen C5 Aircross SUV सह प्रवेश केला. त्यानंतर Citroen C3 ही कंपनीची देशातील दुसरी कार होती. कंपनी लवकरच एक नवीन 7-सीटर SUV देखील देशात लॉन्च करणार आहे. जाणून घ्या


कारची खासियत काय?
Citroen कंपनी 7-सीटर SUV देखील देशात लॉन्च करणार असून ही कार C3 ची 7-सीटर आवृत्ती असेल, तसेच Citroen C3 Plus नावाने बाजारात येण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वी हे वाहन चाचणीदरम्यान दिसले होते. भारतीय बाजारात ही कार Kia Carens आणि Maruti Ertiga सोबत स्पर्धा करेल. दरम्यान Citroen कंपनी भारतात आपला विस्तार सातत्याने वाढवत आहे.  कंपनीने आता आपल्या C5 Aircross SUV ची फेसलिफ्ट व्हर्जन लॉन्च केली आहे.


2023 मध्ये बाजारात दाखल होणार?


ही कार 2023 मध्ये बाजारात दाखल होणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तसेच ही कार यापूर्वीच 7 सीटर कार असेल असा अंदाज वर्तवला जात होता. याबद्दल सांगायचे झाले तर या कारचा पुढचा आणि मागचा लूक C3 सारखा असू शकतो. तसेच या कारची लांबी 4 मीटरपेक्षा जास्त असण्याची शक्यता आहे.तसेच Citroen व्हीलबेस C3 च्या बरोबरीने असू शकते. या नवीन कारचे हेडलाइट्स, टेललाइट्स आणि लोगो C3 प्रमाणेच असू शकतात. याच्या मागील बाजूस डिफॉगर मिळणे अपेक्षित आहे. तसेच यात 17 इंची अलॉय व्हील्स दिसू शकतात. 



इंजिनचे वैशिष्य जाणून घ्या


7-सीटर SUV नवीन कारमध्ये 1.2 लीटर टर्बो पेट्रोल इंजिन दिसू शकते. तसेच यामध्ये C3 प्रमाणे डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर दिले जाऊ शकते. या 7-सीटर कारमध्ये, कंपनी वायरलेस Apple CarPlay आणि Android Auto, स्टीयरिंग माउंटेड कंट्रोल्स, 10-इंच टचस्क्रीन डिस्प्ले आणि फ्लॅट बॉटम स्टीयरिंग व्हीलसाठी सपोर्ट देऊ शकते. 


Datsun GO-Plus ची बाजारपेठ कव्हर करेल?
Citroen च्या आगामी 7-सीटर कारचा आकार आणि व्हीलबेसबाबत अद्याप माहिती नसली तरी, असे मानले जाते की ती Datsun GO-Plus ची बाजारपेठ कव्हर करेल. या कारमध्ये फॉग लॅम्प आणि इतर चेंजेस करण्यात आले आहेत. नवीन कार C3 वर आधारित असल्याने, त्याची किंमत कमी असेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येतेय.


महत्वाच्या बातम्या : 



 


 


Car loan Information:

Calculate Car Loan EMI