Upcoming Cars in 2023 : जर तुम्ही नवीन वर्षात (New Car) कार घेण्याचा विचार करत असाल. तर थोडं थांबा, कारण आम्ही तुम्हाला त्या गाड्यांबद्दल सांगणार आहोत, ज्या नवीन वर्षात (New Year) येणार आहेत. त्यामुळे तुम्ही या पर्यायांचा विचार करू शकता. जेणेकरून तुम्ही अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेली कार निवडू शकता.
मारुती दोन कार लॉन्च करणार
मारुती सुझुकी 2023 मध्ये दोन नवीन SUV लाँच करणार आहे. जानेवारी 2023 मध्ये होणाऱ्या ऑटो एक्सपोमध्ये या गाड्या लाँच केल्या जातील अशी अपेक्षा आहे. या नवीन SUV गाड्यांमध्ये YTB आणि 5-दरवाजा जिमनी लाइफस्टाइल SUV यांचा समावेश आहे. YTB SUV कार एप्रिल 2023 पर्यंत लॉन्च केली जाऊ शकते आणि 5 डोअर कारची विक्री 2023 च्या मध्यापर्यंत सुरू होण्याची शक्यता आहे. HEARTECT प्लॅटफॉर्मवर आधारित या कार (बलेनो क्रॉस किंवा YTB मॅन्युअल) AMT युनिटसह 1.0L बूस्टरजेट पेट्रोल इंजिनच्या असतील.
टाटा दोन कार देखील आणणार
टाटा मोटर्स 2023 मध्ये हॅरियर आणि सफारी एसयूव्हीच्या फेसलिफ्टेड व्हर्जन लाँच करणार आहे. त्यामुळे कंपनी जानेवारीत 2023 ऑटो एक्सपोमध्ये आपले दोन्ही मॉडेल सादर करू शकते अशी अपेक्षा आहे. त्याच्या नवीन मॉडेलच्या डिझाईन आणि इंटीरियरमध्ये बदल पाहायला मिळतात. नवीन हॅरियर आणि सफारी फेसलिफ्ट SUV कार प्रगत ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टम (ADAS) ने सुसज्ज असतील. ज्यामध्ये अडॅप्टिव्ह क्रूझ कंट्रोल (ACC), ऑटोनॉमस इमर्जन्सी ब्रेकिंग, ब्लाइंड स्पॉट मॉनिटरिंग, लेन असिस्टंट यांसारख्या वैशिष्ट्यांसह एक मोठी टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम देखील दिसू शकते.
नवीन वर्षात लाँच होणार्या कारची यादी
टोयोटा एसयूवी कूपे
महिंद्रा थार 5 डोर
महिंद्रा एक्सयूवी400
Hyundai Ai3
Hyundai क्रेटा फेसलिफ्ट
Kia सेल्टॉस फेसलिफ्ट
होंडा कॉम्पॅक्ट एसयूवी
डिसेंबर 2022 मध्ये दोन कारचे लॉन्चिंग
डिसेंबर 2022 मध्ये शेवटच्या आठवड्यात दोन कारचे लॉन्चिंग आणि एक इलेक्ट्रिक कारचे सादरीकरण पाहायला मिळणार आहे. या कारमध्ये मारुती सुझुकी (Maruti Suzuki Grand Vitara) त्यांची ग्रँड विटारा लॉन्च करणार आहे आणि टोयोटा किर्लोस्कर त्यांच्या Hyrider SUV ची CNG व्हर्जन लॉन्च करणार आहे. तर, Hyundai Motor India 20 डिसेंबर 2022 रोजी त्यांच्या Ioniq 5 इलेक्ट्रिक क्रॉसओवर कारचे अनावरण करेल.
महत्त्वाच्या बातम्या :
Mini Electric Scooter: मिनी पण जबरदस्त! फक्त 999 रुपयांमध्ये बुक करू शकता 'ही' इलेक्ट्रिक स्कूटर
Car loan Information:
Calculate Car Loan EMI