Best Mileage SUV : भारतीय ऑटोमोबाईल उद्योगात SUV सेगमेंट झपाट्याने वाढत आहे. वापरकर्त्यांमध्ये एसयूव्ही कारची मागणी सातत्याने वाढत आहे. परंतु ग्राहक हॅचबॅक कार किवा एसयूव्ही खरेदी करताना त्यांना सर्वात मोठी चिंता मायलेजची असते. अशातच आता पेट्रोल आणि डिझेलच्या दरांनी ही चिंता आणखी वाढवली आहे. ग्राहक बर्‍याचदा अशा एसयूव्ही कारच्या शोधात असतात, जी उत्तम फिचर्ससह चांगले मायलेज देते. त्यासाठी देशातील सर्वाधिक मायलेज देणारी SUV कार आहेत, जी फीचर्सच्या बाबतीत कुणापेक्षा कमी नाही. जाणून घ्या


निसान किक्स 1.3T
Nissan Kicks 1.3T 156hp, चार सिलेंडर, 1.3 लीटर टर्बो-पेट्रोल इंजिनसह येते. जपानी कंपनी निसानची ही एसयूव्ही 6 मॅन्युअल आणि सीव्हीटी ट्रान्समिशनसह येते. मायलेजबद्दल बोलायचे झाले तर ही SUV ARAI नुसार 15.8kpl चा मायलेज देते. या कारची एक्स-शोरूम किंमत 14.90 लाख रुपयांपासून सुरू होते.


Kia Seltos 1.5
Kia Seltos 1.5 ही या यादीतील आणखी एक शक्तिशाली SUV आहे. ही कार 115hp, 1.5 लीटर नैसर्गिकरित्या एस्पिरेटेड चार-सिलेंडर इंजिनसह येते. त्याच वेळी, वापरकर्त्यांना यामध्ये 6 मॅन्युअल ट्रान्समिशन किंवा ऑटोमॅटिक ट्रान्समिशन मिळते. ARAI नुसार Kia Seltos 1.5 चे मायलेज 16.65kpl आहे. त्याची एक्स-शोरूम किंमत 11.25 लाख रुपये आहे.


ह्युंदाई क्रेटा 1.5
Hyundai Creta 1.5 ला देखील सेल्टोस सारखेच 115hp, 1.5L नैसर्गिकरित्या एस्पिरेटेड चार-सिलेंडर इंजिन मिळते. वापरकर्त्यांना या SUV मध्ये ऑटोमॅटिक आणि मॅन्युअल ट्रान्समिशन देखील मिळते. मायलेजच्या बाबतीत, Hyundai Creta 1.5 चे ARAI मायलेज 16.85kpl आहे. या कारची एक्स-शोरूम किंमत 10.91 लाख रुपयांपासून सुरू होते.


स्कोडा कुशाक 1.5 TSI
Skoda Kushak 1.5 हा मायलेजच्या बाबतीत या यादीत दुसरा क्रमांक आहे. ही SUV कार 150hp, 1.5-लिटर, चार-सिलेंडर, टर्बो-पेट्रोल इंजिनसह येते. कंपनी याला 6 स्पीड मॅन्युअल किंवा 7 स्पीड डीसीटी गिअरबॉक्स देते. ARAI नुसार Skoda Kushak 1.5 17.83kpl चा मायलेज देते. त्याची एक्स-शोरूम किंमत 17.19 लाख रुपये आहे.


फोक्सवॅगन तैगुन 1.0 TSI (Volkswagen Taigun 1.0 TSI)
मायलेजच्या बाबतीत, Volkswagen Tigun 1.0 पहिल्या क्रमांकावर आहे. या SUV ला 115hp, 1.0 लीटर, तीन सिलेंडर इंजिन मिळते जे तिची सरासरी 6 टक्क्यांनी वाढवते. हा प्रकार 6 मॅन्युअल ट्रान्समिशन आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसह येतो. ARAI नुसार Volkswagen Tygun 1.0 चे मायलेज 18.23kpl आहे. त्याची एक्स-शोरूम किंमत 11.40 लाख रुपये आहे.


इतर महत्वाची बातमी: 


Keeway ने भारतात लॉन्च केली 125cc बाईक, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स


 


Car loan Information:

Calculate Car Loan EMI