Keeway sr125 Price In India: नवीन वाहन उत्पादक कंपनी सध्या भारतीय बाजारपेठेत आपलं स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. कंपनीने आतापर्यंत पाच दुचाकी लॉन्च केली आहे. ज्यात तीन बाईक आणि दोन स्कूटरचा समावेश आहे. अशातच आज कंपनीने आपली नवीन बाईक Keeway SR125 भारतात लॉन्च केली आहे. कंपनीच्या या 125cc बाईकची किंमत 1.19 लाख रुपये (एक्स-शोरूम) ठेवली आहे. या किमतीत ही बाईक काही सर्वात महागड्या 125cc बाईकमध्ये सामील झाली आहे. कंपनीने ही बाईक व्हाईट, ब्लॅक आणि रेड अशा तीन रंगात लॉन्च केली आहे.


Keeway SR125 ही स्क्रॅम्बलर बाईकसारखी दिसते. याची डिझाइन काहीशी Yamaha RX100 सारखी आहे. या कम्युटर बाईकला पुढील बाजूस गोल एलईडी हेडलॅम्प, गोल टर्न इंडिकेटर आणि लहान टेल लाइट मिळतो. ही बाईक फक्त स्पोक व्हील मॉडेलमध्ये देण्यात आली आहे.


या बाईकमध्ये रेट्रो दिसणारी इंधन टाकी, रिब्ड सीट आणि साइड पॅनल्स देण्यात आले आहेत. यामध्ये एक छोटा सायलेन्सर बसवण्यात आला आहे. ज्यावर क्रोम मफलर देण्यात आला आहे. Keyway SR125 ला पुढील आणि मागील बाजूस जाड टायर्स मिळतात. ज्यामुळे बाईकला मस्क्यूलर लूक मिळतो. ब्रेकिंग सिस्टिम सुधारण्यासाठी बाईकच्या दोन्ही चाकांवर डिस्क ब्रेक लावण्यात आले आहेत. एकूणच ही बाईक रेट्रो लूकमध्ये आधुनिक बाईकचे आकर्षण देते. Keyway SR125 ला पुढच्या बाजूला टेलिस्कोपिक फॉर्क्स आणि मागच्या बाजूला स्प्रिंग लोडेड ड्युअल शॉक मिळतात.


फीचर्स 


Keeway SR 125 मध्ये सर्कुलर डिजिटल इन्स्ट्रुमेंट डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले इंधन, रिअल टाइम मायलेज, स्पीड आणि गियर पोझिशन याविषयी माहिती देतो. याशिवाय बाईकमध्ये डेटाइम रनिंग लाईट, साइड स्टँड कटऑफ स्विच, कॉम्बी ब्रेकिंग सिस्टिम आणि हॅझर्ड स्विच देण्यात आले आहेत. या बाईकमध्ये फ्रंट सस्पेन्शन असून 128 मिमी ट्रॅव्हल आहे. याचा बॅक सस्पेंशन सेटअप 5-स्टेपमध्ये अड्जस्ट केला जाऊ शकतो. कंपनीने या बाईकमध्ये 17-इंच फ्रंट आणि रियर स्पोक व्हील दिले आहे. 


इंजिन


कंपनीने Keeway SR125 मध्ये 125cc इंधन इंजेक्टेड एअर-कूल्ड इंजिन बसवले आहे. हे इंजिन 8.2 Nm च्या पीक टॉर्कसह 9.7 bhp ची  पॉवर जनरेट करते. बाईकमध्ये 5-स्पीड गिअरबॉक्स वापरण्यात आला आहे. याचे इंजिन मागील चाकाला साखळीने जोडलेले आहे.


Car loan Information:

Calculate Car Loan EMI