2022 TVS Raider Launched: भारतात 125 सीसी सेगमेंट बाईकला अधिक पसंत केलं जात. कारण या सेगमेंटमधल्या बाईक परवडणाऱ्या असून यात फीचर्सही चांगले मिळतात. तसेच 125 सीसी सेगमेंटमधील बाईक स्टायलिश असण्यासोबतच यात मायलेजही चांगला मिळतो. अशातच प्रसिद्ध दुचाकी उत्पादक कंपनी TVS ने अली नवीन Raider 125 काही अपडेट्ससह लॉन्च केली आहे. कंपनीने याची किंमत  99,990 रुपये इतकी ठेवली आहे. ही एक्स-शोरूम किंमत आहे. जुन्या मॉडेलच्या तुलनेत याची किंमत सुमारे 9000 रुपयांनी वाढवण्यात आली आहे. यासोबतच TVS Raider 125 मध्ये एक नवीन डिजिटल TFT इन्स्ट्रुमेंट क्लस्टर देण्यात आला असून त्यात कोणतेही यांत्रिक बदल करण्यात आलेले नाहीत.


TVS Raider 125 ही कंपनीच्या लोकप्रिय बाइक्सपैकी एक आहे. सणासुदीच्या सीझनमध्ये कंपनीने याचे नवीन अपडेट आणले आहे. TVS Raider 125 मधील नवीन TFT डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि SmartXconnect कनेक्टिव्हिटी तंत्रज्ञान हे सर्वात मोठे अपडेट आहे. जे बाईकला मोबाइलशी कनेक्ट करण्यास मदत करते. यासोबतच नवीन TVS Raider 125 मध्ये ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी देखील देण्यात आली आहे. जी स्मार्टफोनशी कनेक्ट केल्याने नोटिफिकेशन अलर्ट करते. यात हवामानाची माहिती आणि टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशन मिळते. याच्या इन्स्ट्रुमेंट क्लस्टरवर कमी इंधन अलर्ट देखील करते आणि यासह ही बाईक तुम्हाला जवळच्या पेट्रोल पंपाची माहिती देखील देईल.


यासोबतच TVS Raider 125 मध्ये व्हॉईस रेकग्निशनचे फीचर देखील देण्यात आले आहे, ज्याच्या मदतीने तुम्ही बोलून नेव्हिगेशन किंवा म्युझिक सारखे फीचर नियंत्रित करू शकता.  आणखी एक खास गोष्ट म्हणजे या लॉन्चसह मेटाव्हर्समध्ये लॉन्च होणारी ही पहिली बाईक बनली आहे. या बाईकमध्ये 124.8 cc इंजिन आहे. जे 11.4 hp पॉवर आणि 11.2 न्यूटन मीटर टॉर्क जनरते करते. ही बाईक  फक्त 5.9 सेकंदात 0 ते 60 किमी/ताशी वेग पाकडे. याचो टॉप स्पीड  99 किमी/तास आहे. यात मल्टिपल रायडिंग मोड्स आहेत आणि ते 5-स्पीड गिअरबॉक्सशी जोडलेले आहे. तसेच यात 17-इंचाचे अलॉय व्हील देण्यात आले आहेत.


उत्तम मायलेजसाठी या बाइकमध्ये इकोथ्रस्ट फ्युएल इंजेक्शन तंत्रज्ञान देण्यात आले आहे. कंपनी म्हणते की, TVS IntelliGo उत्तम मायलेज देते. यात सस्पेंशनसाठी मोनोशॉक सस्पेन्शन आहे. तर फक्त पुढच्या चाकाला डिस्क ब्रेक मिळतो. तसेच यात सीट स्टोरेज, साइड स्टँड इंडिकेटर, हेल्मेट रिमाइंडर, यूएसबी चार्जर अंतर्गत देण्यात आले आहे.


दरम्यान, Keeway ने देखील आपली नवीन SR125 भारतात लॉन्च केली आहे.  कंपनीच्या या 125cc बाईकची किंमत 1.19 लाख रुपये (एक्स-शोरूम) ठेवली आहे. या किमतीत ही बाईक काही सर्वात महागड्या 125cc बाईकमध्ये सामील झाली आहे. कंपनीने ही बाईक व्हाईट, ब्लॅक आणि रेड अशा तीन रंगात लॉन्च केली आहे.


इतर महत्वाची बातमी: 


Keeway ने भारतात लॉन्च केली 125cc बाईक, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स


 


Car loan Information:

Calculate Car Loan EMI