Top 5 Affordable Bikes: Honda Motorcycle and Scooters India ने काही दिवसांपूर्वी देशात 100cc ची नवीन बाईक Shine 100 लॉन्च केली आहे. 100cc कम्युटर सेगमेंटमधील ही कंपनीची पहिली बाईक आहे. तसेच ही देशातील सर्वात स्वस्त मोटारसायकलींपैकी एक आहे. तुम्हालाही नवीन स्वस्त बाईक घ्यायची असेल, तर आज आम्ही तुम्हाला देशातील टॉप 5 सर्वात स्वस्त बाईक्सबद्दल सांगणार आहोत.


Top 5 Affordable Bikes In India: Hero HF 100


Hero HF 100 ही सध्या भारतातील सेगमेंटमधील सर्वात स्वस्त बाईक आहे, ज्याची एक्स-शोरूम किंमत 54,962 रुपये आहे. यात HF Deluxe सह 97cc इंजिन देखील आहे. जे 8hp पॉवर आणि 8.05Nm टॉर्क जनरेट करते. मात्र यात i3S स्टॉप-स्टार्ट तंत्रज्ञान दिसत नाही. यामध्ये किक-स्टार्टरचा एकच पर्याय आहे.


Top 5 Affordable Bikes In India: हिरो एचएफ डिलक्स


Hero HF Deluxe, 100cc सेगमेंटमधील सर्वात लोकप्रिय दुचाकी मॉडेल्सपैकी एक आहे. याची एक्स-शोरूम किंमत 61,232 रुपये ते 68,382 रुपयांदरम्यान आहे. यात 97cc 'स्लोपर' इंजिन आहे, जे Hero च्या i3S स्टॉप-स्टार्ट तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे. किक स्टार्टर याच्या खालच्या प्रकारांमध्ये उपलब्ध आहे आणि इलेक्ट्रिक स्टार्टर वरच्या प्रकारांमध्ये उपलब्ध आहे.


Top 5 Affordable Bikes: TVS Sport 


TVS Sport ची एक्स-शोरूम किंमत 61,500 रुपये ते 69,873 रुपये आहे. यात 109.7cc इंजिन आहे, जे 8.3hp पॉवर आणि 8.7Nm टॉर्क जनरेट करते. यामध्ये किक स्टार्ट आणि सेल्फ स्टार्ट अशा दोन्ही सुविधा उपलब्ध आहेत.


Top 5 Affordable Bikes: होंडा शाइन 100


Honda Shine 100 ची एक्स-शोरूम किंमत 64,900 रुपये आहे. ऑटो चोक सिस्टीम आणि साइड-स्टँड इंजिन कट-ऑफ सारख्या फीचर्ससह ही एक सध्या स्टाईलसह येणार बाईक आहे. या बाईकमध्ये OBD-2A कंप्लायंट आणि E20 इंधन सपोर्टिंग इंजिन मिळते. हे 99.7cc इंजिनद्वारे समर्थित आहे, जे 7.61hp पॉवर आणि 8.05Nm टॉर्क जनरेट करते. यामध्ये इलेक्ट्रिक स्टार्टरही देण्यात आला आहे.


Top 5 Affordable Bikes: बजाज प्लॅटिना 100 


बजाज प्लॅटिना 100 ची एक्स-शोरूम किंमत 67,475 रुपये आहे. यात बजाजच्या सिग्नेचर DTS-i तंत्रज्ञानासह 102cc इंजिन वापरण्यात आले आहे. सेगमेंटमधील ही एकमेव बाईक आहे ज्याला इंधन-इंजेक्शन मिळत नाही. त्याऐवजी ती बजाजची ई-कार्ब वापरते. हे इंजिन 7.9hp पॉवर आणि 8.3Nm टॉर्क जनरेट करते. यामध्ये समोर LED DRL दिसत आहे.


Car loan Information:

Calculate Car Loan EMI