Upcoming Bikes in August 2022 : ऑगस्टमध्ये अनेक दमदार बाईक भारतात लॉन्च होणार आहेत. यात रॉयल एनफिल्ड ते हार्ले डेविडसन सारख्या कंपन्या आपल्या बाईक भारतीय बाजारात सादर करणार आहेत. याचबद्दल अधिक माहिती जाणून घेऊ.


Royal Enfield Hunter 350 


ही रॉयल एनफील्ड सीरीजमधील सर्वात परवडणारी बाईक असू शकते. जी कंपनी 7 ऑगस्ट रोजी लॉन्च  करू शकते. ही बाईक कंपनीची आतापर्यंतची सर्वात हलकी बाईक असू शकते. ज्याचे वजन फक्त 180 किलो असेल. या बाईकला कंपनीचे Meteor आणि नवीन Classic 350 J-सिरीज इंजिन मिळू शकते. जे 20.2hp ची पॉवर आणि 27 Nm चा पीक टॉर्क जनरेट करू शकते. हंटर 350 बाईकची किंमत 1.5 लाख ते 1.6 लाख रुपये असण्याची शक्यता आहे.


2022 Royal Enfield Bullet 350


या ऑगस्टमध्ये रॉयल एनफील्ड आपली बुलेट 350 बाईक एका नवीन अवतारात बाजारात आणणार आहे. ही सध्या कंपनीची बुलेट 350 एंट्री-लेव्हल बाईक आहे. या नवीन जनरेशन बुलेट 350 मध्ये J-प्लॅटफॉर्मवर तयार केलेल्या इंजिनमध्ये ट्रिपर नेव्हिगेशन फीचर्स देखील दिले  जाऊ शकतात. कंपनी त्याची किंमत 1.7 लाख रुपये ठेवू शकते.


Updated Hero Xpulse 200T


Hero Motocorp आपली ऑफ-रोडिंग बाईक Xpulse 200T चे अपडेटेड मॉडेल या महिन्यात लॉन्च करू शकते. कंपनी हे नवीन मॉडेल 4V इंजिनच्या सपोर्टसह देऊ शकते. Xpulse 200T ला 17-इंच अलॉय व्हील्स मिळतात. बाईकच्या नवीन मॉडेलमध्ये रिपोझिशन केलेले हेडलॅम्प, फोर्क गेटर आणि नवीन रंग पर्याय दिसू शकतात. कंपनी हे नवीन मॉडेल 1.24 लाख रुपयांच्या किंमतीसह बाजारात आणू शकते.


Honda Bigwing Model 


होंडाच्या बिगविंग डीलरशिप लाइनअपमध्ये नवीन बाईक मॉडेल जोडू शकते. ही बाईक 8 ऑगस्टला लॉन्च होणार आहे. या बाईकबद्दल अजून कोणतीही माहिती समोर आलेली नाही. पण ही CB500X चे अपडेटेड व्हर्जन असण्याची अपेक्षा आहे.


Harley Davidson Nightster 


ऑगस्टमध्ये कंपनी आपले बहुप्रतिक्षित नाईटस्टर मॉडेल लॉन्च करू शकते. या बाईकमध्ये 975 cc इंजिन मिळू शकते. जे 89 hp पॉवर आणि 96 Nm टॉर्क जनरेट करू शकते. कंपनीने मागील वर्षी आपले स्पोर्टस्टर एस मॉडेल लॉन्च केले होते.


Car loan Information:

Calculate Car Loan EMI