Lamborghini Huracan Tecnica: सुपरकार निर्माता कंपनी लॅम्बोर्गिनी इंडियाने (Lamborghini India) आपली नवीन लॅम्बोर्गिनी Huracan Technica भारतीय बाजारपेठेत लॉन्च केली आहे. कंपनीने या वर्षी एप्रिलमध्ये V10 स्पोर्ट्स कारचे नवीन व्हर्जन सादर केली होती. Huracan STO आणि Huracan Evo RWD मध्ये Huracan Technica ठेवण्यात आली आहे. कंपनीने या कारची किंमत 4 कोटी रुपये इतकी ठेवली आहे.



फीचर्स (Lamborghini Huracan Tecnica Features)


नवीन Lamborghini Huracan Technica कॉस्मेटिक अपडेट्स आणि फीचर अॅडिशनसह लॉन्च करण्यात आली आहे. मात्र याच्या पॉवरट्रेनमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. ही कार लॅम्बोर्गिनी Huracan Technica कंपनीच्या मोठ्या व्हर्जनपासून प्रेरित आहे. या कारच्या बंपरच्या दोन्ही बाजूला Y-आकाराचे इन्सर्ट, एक सुधारित विंडो लाईन, नवीन 20-इंच अलॉय व्हील, कार्बन-फायबर इंजिन कव्हर्स, एक स्थिर मागील स्पॉयलर आणि एक एकीकृत डिफ्यूझर देखील यात मिळतो.  नवीन Lamborghini Huracan Technica च्या इंटिरिअर्सबद्दल सांगायचे तर, कार हार्नेस सीट बेल्ट, हाईट -अ‍ॅडजस्टेबल सीट आणि ट्वीक केलेला HMI इंटरफेस या स्वरूपात अपडेट करण्यात आली आहे. इतर फीचर्समध्ये कार्बन-सिरेमिक ब्रेक्स, LDVI, मागील एक्सल स्टीयरिंग आणि टॉर्क वेक्टरिंग यांचा समावेश आहे.


इंजिन (Lamborghini Huracan Tecnica Engine)


2022 Lamborghini Huracan Technica मध्ये 5.2-लीटर नॅचरल एस्पिरेटेड V10 इंजिन वापरण्यात आले आहे. हे इंजिन 640 Bhp ची पॉवर आणि 565 Nm कमाल टॉर्क जनरेट करते. हे इंजिन 7-स्पीड ड्युअल-क्लच ऑटोमॅटिक गिअरबॉक्सशी जोडलेले आहे. कंपनीचा दावा आहे की, ही कार 3.2 सेकंदात 0 ते 100 किमी प्रतितास आणि 9.1 सेकंदात 200 किमी प्रतितास वेग मिळवू शकते. तसेच या कारचा कमाल वेग ताशी 325 किमी सांगितला जात आहे.


नवीन 2022 Lamborghini Huracan Technica चे वजन 1,379 kg आहे. या कारमधील वजन कमी करण्यासाठी कंपनीने याच्या पुढील बोनेट आणि मागील हूडवर कार्बन फायबरचा पुरेसा वापर केला आहे. याबाबत बोलताना लॅम्बोर्गिनी इंडियाचे प्रमुख शरद अग्रवाल म्हणाले, “स्थानिक बाजारपेठेत वेगाने नवीन मॉडेल आणणे हा भारतातील आमच्या वाढीचा प्रमुख आधारस्तंभ आहे. आज भारतात लॅम्बोर्गिनी Huracan Technica सादर करताना आम्हाला आनंद होत आहे.''


महत्वाच्या बातम्या : 



Car loan Information:

Calculate Car Loan EMI