Venue Venue N-Line Price : कोरियन कार निर्माता कंपनी Hyundai Motor देशात आपली SUV Venue N-Line लॉन्च करणार आहे. ही नवीन SUV कंपनीच्या N-Line सीरिजमधील दुसरे मॉडेल असणार आहे. कंपनी पुढील महिन्यात 6 सप्टेंबरला या नवीन SUV ची किंमत जाहीर करणार आहे. यापूर्वी, Hyundai ने 2021 मध्ये त्यांच्या hatchback i20 चे N Line व्हर्जन लाँच केले होते. 


फेसलिफ्ट व्हर्जन लवकरच :


काही महिन्यांपूर्वीच कंपनीने या कारचे फेसलिफ्ट व्हर्जन लॉन्च केले होते. ज्यामध्ये 1.0 Turbo GDi पेट्रोल आणि 1.5-लीटर CRDi डिझेलचे दोन इंजिन पर्याय उपलब्ध आहेत. या सब कॉम्पॅक्ट एसयूव्ही कारची सुरुवातीची किंमत 7.53 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे. तर, त्याच्या टॉप एंड व्हेरिएंटची किंमत 9.99 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे. ही कार भारतीय बाजारपेठेतील Tata Nexon, Kia Sonet, Renault Kiger, Maruti Suzuki Vitara Brezza, Mahindra XUV300 आणि Nissan Magnite सारख्या कारशी स्पर्धा करणार आहे.


Hyundai Venue N-Line चे इंजिन कसे असेल?


Venue N-Line मध्ये 1.0L 3 सिलेंडर टर्बो पेट्रोल इंजिन दिले जाऊ शकते, जे 118 Bhp ची पॉवर आणि 172 Nm टॉर्क जनरेट करू शकते. कारला 7-स्पीड DSG गिअरबॉक्स ट्वीक्ससह मिळण्याची अपेक्षा आहे. 


किंमत किती असेल? (Check Price) :


या कारच्या मोबिलिटी अॅडव्हेंचरचा आभासी अनुभव घेण्यासाठी Hyundai Metaverse ची मदत घेणार आहे. यासाठी तुम्ही प्ले स्टोअर वापरून तुमच्या स्मार्टफोन किंवा लॅपटॉपवर रोब्लॉक्स अॅप डाऊनलोड करू शकता, ज्याच्या मदतीने व्हेन्यू एन लाईनचे व्हर्च्युअल लॉन्च पाहता येईल. या कारची किंमत साधारण 10 लाखांपर्यंत आहे.


लूक कसा असेल? 


या नव्या एसयूव्हीचा लूक सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या मॉडेलसारखाच असण्याची अपेक्षा आहे. कारला Hyundai i20 प्रमाणे थोडे कडक सस्पेंशन मिळण्याची शक्यता आहे. मात्र, या कारच्या इंटिरिअरमध्ये अनेक नवीन वैशिष्ट्यांसोबतच काही बदलसुद्धा पाहायला मिळतील अशी अपेक्षा आहे. 


महत्वाच्या बातम्या : 



Car loan Information:

Calculate Car Loan EMI