Anant Ambani Car Collection: सध्या सगळीकडे देशातील सर्वात मोठे उद्योगतपती मुकेश अंबानी यांचे पुत्र अनंत अंबानी (Anant Amban) आणि राधिका मर्चंट (Radhika Merchants) यांच्या शाही विवाह सोहळ्याची चर्चा सुरु आहे. पुढच्या महिन्यात या दोघांचा विवाह सोहळा संपन्न होणार आहे. तुम्हाला अनंत अंबानी यांच्याकडे कोणत्या गाड्या आहेत, याबाबतची माहिती आहे का? तर आज आपण अनंत अंबानी यांच्याकडे कोण कोणत्या गाड्या (Anant Ambani Car Collection) आहोत, याबबातची माहिती पाहणार आहोत.


अनंत अंबानी यांच्याकडं महागड्या गाड्यांचा संग्रह आहे. कोट्यावघी रुपयांच्या वेगवेगळ्या कंपन्यांच्या गाड्या त्यांच्याकडं आहेत. अनंत अंबानींच्या कलेक्शनमध्ये बहुतांशी लक्झरी गाड्यांचा समावेश आहे. जाणून घेऊयात त्यांच्याकडे नेमक्या कोणत्या गाड्आ आहेत. 


रोल्स रॉइस कलिनन (Rolls-Rouce Cullinan)


अनंत अंबानी यांच्याकडे रोल्स रॉइस कलिनन (Rolls-Rouce Cullinan) ही गाडी आहे. अलीकडेच ते त्यांच्या रोल्स-रॉयल कलिनन ब्लॅक बॅज कारमध्ये फिरताना दिसले होते. अनंत अंबानी अजय देवगण आणि काजोलचे घरातून बाहेर पडताना  त्यांच्या रोल्स रॉयसमध्ये दिसले होते. Rolls Royce Cullinan Black Badge ची किंमत 6.95 कोटी रुपये आहे. त्याच वेळी, ही लक्झरी कार कस्टमाइझ केली जाऊ शकते, ज्यामुळे या कारची किंमत आणखी वाढते.


मर्सिडीज-बेंझ एस क्लास (Mercedes-Benz S Class)


मर्सिडीज-बेंझ एस क्लास ही एक उत्तम आलिशान कार आहे. या कारमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. या कारचे आतील भाग अनेक अत्याधुनिक वैशिष्ट्यांनी सज्ज आहे. या वाहनाची एक्स-शोरूम किंमत 1.77 कोटी रुपयांपासून सुरू होते आणि 1.86 कोटी रुपयांपर्यंत जाते.


रेंज रोव्हर वोग  (Range Rover Vogue) 


रेंज रोव्हर वोग  (Range Rover Vogue)  ही एक अलिशान कार आहे. अनंत अंबानी यांच्याकडे ही देखील कार आहे. या कारची किंमत 2.26 कोटी रुपये आहे. अनेक वैशिष्ट्यांनी ही कार परिपूर्ण आहे. रेंज रोव्हर वोगमध्ये 2996 cc, 6-सिलेंडर इनलाइन, 4-व्हॉल्व्ह, DOHC इंजिन आहे, जे 5,500 rpm वर 394 bhp ची पॉवर निर्माण करते आणि 2,000 rpm वर 550 Nm टॉर्क जनरेट करते. या कारची किंमत 2.26 कोटी रुपये आहे.


मर्सिडीज-बेंझ जी६३ एएमजी  (Mercedes-Benz G63 AMG)


Mercedes-Benz G63 AMG त्याच्या दमदार कामगिरीसाठी ओळखले जाते. या मर्सिडीज-बेंझ कारमध्ये 3982 सीसी इंजिन आहे. या कारमध्ये पाच जणांची बसण्याची क्षमता आहे. या कारची किंमत 2.45 कोटी रुपयांपासून सुरू होते आणि 3.30 कोटी रुपयांपर्यंत जाते.


BMW i8 (BMW i8)


BMW i8 ही कार ऑटोमोटिव्ह इनोव्हेशनवर आधारित आहे. या कारचे डिझाईन खूपच छान आहे. तसेच या कारमध्ये हायब्रीड तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. या कारची किंमत 2.14 कोटी रुपये आहे.


रोल्स रॉयस फँटम ड्रॉपहेड कूप  (Rolls-Royce Phantom Drophead Coupe)


Rolls-Royce Phantom Drophead Coupe मध्ये 6749 cc इंजिन आहे. हे इंजिन 460 bhp पॉवर आणि 720 Nm टॉर्क जनरेट करते. ही कार 15 कलर व्हेरियंटसह येते. या रोल्स रॉइस कारची किंमत 6.83 कोटी रुपये आहे.


महत्वाच्या बातम्या:


Anant Ambani Radhika Merchant Wedding Invitation : सोन्याची मूर्ती, चांदीचं मंदिर..भक्ती आणि परंपरेचा मेळ, अनंत-राधिकाची लग्नपत्रिका पाहिली का?


 


Car loan Information:

Calculate Car Loan EMI