Hyundai Car Festival Discount: वाहन उत्पादक कंपनी ह्युंदाई (Hyundai) मोटर्सने स्पेशल फेस्टिव्ह सिझनची घोषणा केली आहे, ज्यानुसार कंपनी निवडक लोकप्रिय मॉडेल्सवर 50,000 रुपयांपर्यंतची सूट देऊ करत आहे. जर तुम्ही ह्युंदाईची नवीन कार खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर ऑक्टोबर 2023 म्हणजेच या महिन्यात ह्युंदाई आपल्या अनेक मॉडेल्सवर ऑफर्स देत आहे, ज्याचा लाभ तुम्ही मिळवू शकता.


ह्युंदाई Grand i10 Nios


ह्युंदाई कंपनीची ग्रँड i10 Nios ही एक लोकप्रिय हॅचबॅक कार आहे. सणासुदीच्या काळात कंपनी या मॉडेलवर 43 हजारांपर्यंतचा डिस्काऊंट देत आहे. यामध्ये 30,000 रुपयांची रोख सूट, 10,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि MNC आणि सरकारी कर्मचाऱ्यांसाठी 3,000 रुपयांची सूट समाविष्ट आहे. सध्या भारतीय बाजारात ह्युंदाई ग्रँड i10 Nios ची किंमत 5.84 लाख रुपये इतकी आहे. यामध्ये वापरकर्त्यांना 1.2 लिटरचं इंजिन देण्यात आलं आहे.


ह्युंदाई Aura


ह्युंदाई Aura ही ह्युंदाईची सेडान कार आहे. हे मॉडेल ग्रँड i10 या मॉडेलवर आधारित आहे. ह्युंदाई ऑक्टोबर महिन्यामध्ये या मॉडेलवर 33 हजारांपर्यंत डिस्काऊंट देत आहे. ज्यामध्ये पेट्रोल AMT आणि MT प्रकारांवर 10,000 रुपयांची रोख सूट आहे, तर CNG प्रकारांवर ही सूट 20,000 रुपये आहे. याशिवाय 10,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि 3000 रुपयांची कॉर्पोरेट सूट देखील समाविष्ट आहे.


ह्युंदाई अल्काझार


पुढील कार Hyundai Alcazar आहे, जी क्रेटापेक्षी उत्तर आहे. कंपनी यावर 20,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस देत आहे.


ह्युंदाई Verna


ह्युंदाई वेरना हे कंपनीचे एक लोकप्रिय मॉडेल आहे. आतापर्यंत या कारचे अनेक फेसलिफ्ट आणि नवीन जनरेशनमधील मॉडेल्स भारतीय बाजारात लाँच झाले आहेत. नुकतेच कंपनीने याचं नवीन अपडेटेड मॉडेल लाँच केलं आहे. या गाडीवर ग्राहकांना 25 हजारांपर्यंतचा डिस्काउंट मिळणार आहे. ही कार तुम्ही 10.96 लाख रुपयांच्या एक्स-शोरूममध्ये खरेदी करू शकता. या कारला GNCAP मध्ये 5 स्टार सुरक्षा रेटिंग मिळालं आहे.


ह्युंदाई i20 N Line


ह्युंदाई i20 हे मॉडेल कंपनीच्या N सेगमेंटमधील मॉडेल आहे. कंपनी आपल्या i20 N सेगमेंटमधील प्री-फेसलिफ्ट मॉडेलवर 50 हजारांपर्यंतचा डिस्काऊंट देत आहे. कंपनी आपल्या एन-लाईनवर 10,000 रुपयांपर्यंतच्या ऑफर देखील देत आहे. फेसलिफ्ट ह्युंदाई N सेगमेंटवर 10 हजारांचा डिस्काऊंट मिळणार आहे. 


हेही वाचा:


Mercedes Benz EV Discount Offer: मर्सिडीज देत आहे इलेक्ट्रिक कारवर मजबूत डिस्काऊंट; EV वर 5 लाखांची बचत


Car loan Information:

Calculate Car Loan EMI