Tata Motors: टाटा मोटर्सने त्यांच्या दोन नवीन SUV टाटा हॅरियर (Tata Harrier) आणि टाटा सफारी फेसलिफ्ट (Tata Safari Facelift) लाँच करण्याची घोषणा केली आहे, या दोन्हीच्या अद्ययावत आवृत्त्या नुकत्याच नवीन डिझाईन फिचर्ससह दिसल्या आहेत, आता फक्त त्यांचं लाँचिंग बाकी आहे. टाटा हॅरियर आणि सफारी फेसलिफ्ट खरेदी करण्यासाठी ग्राहक 25,000 रुपयांच्या रकमेसह प्री बुकिंग करू शकतात.


दिसायला कशी?


सध्याच्या मॉडेलच्या तुलनेत नवीन Tata Harrier आणि Safari चे फेसलिफ्ट केलेले मॉडेल आकर्षक आहे. लूक आणि डिझाईनवर अधिक भर देण्यात आलेला आहे. या दोन्ही SUV मध्ये नवीन रंग पर्याय, कनेक्ट केलेले एंड-टू-एंड LED DRL आणि टेल लॅम्प तसेच नवीन लोखंडी जाळी आणि चांगले बंपर दिसतील.


सध्याच्या मॉडेल्सच्या तुलनेत, टाटा हॅरियर आणि सफारीचे आगामी अपडेटेड मॉडेल्स खूप पॉवरफूल आणि आकर्षक आहेत. सफारीमध्ये 19-इंच आणि हॅरियरमध्ये 18-इंच नवीन अलॉय व्हील देण्यात आले आहेत.


केबिन फिचर्स


या दोन्ही गाड्यांच्या केबिन फिचर्सबद्दल जाणून घेऊया. 2023 टाटा हॅरियर आणि सफारी फेसलिफ्टच्या आतील भागात अनेक खास गोष्टी देण्यात आल्या आहेत. या दोन्ही एसयूव्हीत इल्यूमिनिटेड स्टीयरिंग व्हील, 4-स्पोक व्हील स्टीयरिंग, वेंटिलेटेड सीट्स, फ्रंट सेंटर आर्मरेस्टमध्ये कूल स्टोरेज यासह इतर अनेक चांगले फिचर्स देण्यात आले आहेत.


नवीन सफारी आणि हॅरियरला 12.3-इंच मोठ्या टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, 10.25-इंचाचा डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले, टच-आधारित सेंट्रल कंट्रोल पॅनल, नवीन मूड लाइटिंग सिस्टम, वायरलेस चार्जर देण्यात आले आहेत. ड्युअल-झोन क्लायमेट कंट्रोल, पॉवर अ‍ॅडजस्टेबल आणि व्हेंटिलेटेड फ्रंट सीट्स (सफारीमध्ये अधिक आहेत), क्रूझ कंट्रोल, पॅनोरॅमिक सनरूफ, ADAS सह 360-डिग्री कॅमेरा आणि 7 एअरबॅग देखील आहेत.


इंजिन


नवीन फेसलिफ्ट केलेले मॉडेल आता नवीन इलेक्ट्रिक पॉवर स्टीयरिंगसह सुसज्ज आहेत, ते पूर्वीपेक्षा हलके असून आता कार चालवणं सोपं जाणार आहे. त्याच्या पॉवरट्रेनमध्ये कोणताही बदल नसला तरी, दोन्ही वाहनांना समान 2.0-L Kryotech डिझेल इंजिन मिळेल, जे जास्तीत जास्त 168 hp आणि 350 NM चा पीक टॉर्क निर्माण करण्यास सक्षम असेल. यामध्ये उपस्थित असलेला 6-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स समोरच्या चाकाला पॉवर देण्याचे काम करतो.


किंमत


या दोन्ही कारच्या किंमतीबद्दल बोलायचं झाल्यास, नवीन हॅरियर फेसलिफ्टची किंमत सुमारे 15 लाख रुपये ठेवली जाऊ शकते, तर सफारी 16 लाख रुपयांच्या एक्स-शोरूममध्ये लॉन्च केली जाऊ शकते.


हेही वाचा:


Tata Safari Dark Edition: टाटा सफारी डार्क एडिशन आता नव्या रुपात; इंटेरियर्ससह पाहा कारचा दमदार लूक


Car loan Information:

Calculate Car Loan EMI