Yamaha New Scooters: जपानी दुचाकी उत्पादक कंपनी यामाहाने आपल्या दोन अपडेटेड स्कूटर भारतात लॉन्च केल्या आहेत. फॅसिनो 125 आणि यामाहा रे-झेडआर अशी त्यांची नावं आहे. देशांतर्गत बाजारात या स्कूटर्स Hero Electric Optima, Hero Electric Photon, Bounce Infinity E1, Bajaj Chetak, Ola S1, Ather 450X, Vida V1, Honda Activa 6G, TVS Jupiter, Suzuki Access, Hero Destini यांसारख्या स्कूटरशी स्पर्धा करतात. कंपनीने आपल्या या दोन्ही स्कूटरमध्ये नेमकं काय अपडेट केलं आहे? यात कोणते नवीन फीचर्स अॅड केले आहेत, याबाबत अधिक माहिती जाणून घेऊ...
Yamaha New Scooters: लूक
या दोन्ही यामाहा स्कूटरच्या लूकबद्दल बोलायचे झाल्यास यात इंडिकेटर/हेडलाइट-माउंट फ्रंट एप्रन, फ्लॅट फूटबोर्ड, ग्रॅब रेलसह सिंगल-पीस सीट, साइड-माउंट केलेले एक्झॉस्ट, तसेच दोन्ही स्कूटरवर यामाहा वाय-कनेक्ट आहे. यामध्ये अॅप सपोर्ट , LED लाइटिंग सेटअप आणि ब्लूटूथ सपोर्टेड डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर उपलब्ध आहेत. याशिवाय यात तीन नवीन रंग पर्याय (डार्क मॅट ब्लू, मॅट ब्लॅक आणि लाइट ग्रे वर्मिलियन) देखील मिळतात.
Yamaha New Scooters: इंजिन
दोन्ही स्कूटरला पॉवर देणार्या इंजिनबद्दल बोलायचे झाल्यास, Yamaha Fascino स्कूटरला एअर-कूल्ड फ्यूल-इंजेक्टेड 125cc इंजिन मिळते. ज्यासाठी त्याच्या नावात Fi जोडले गेले आहे. हे इंजिन स्कूटरला 6,500rpm वर 8bhp पॉवर आणि 5,000rpm वर 10.3Nm टॉर्क देण्यास सक्षम आहे. तसेच एक स्मार्ट मोटर जनरेटर (SMG) प्रणाली देखील एक हायब्रीड पर्याय म्हणून देण्यात आली आहे. ज्यामुळे कंपनी त्याच्या चांगल्या मायलेजचा दावा करते. Razor 125 चे इंजिन देखील असेच आहे.
Yamaha New Scooters: फीचर्स
फीचर्स म्हणून दोन्ही स्कूटरना समोरच्या चाकावर डिस्क/ड्रम ब्रेक, मागच्या चाकावर ड्रम ब्रेकचा पर्याय, रस्त्यांवर चांगल्या प्रकारे हाताळणीसाठी कम्बाइंड ब्रेकिंग सिस्टम (CBS) मिळतात. सस्पेन्शनबद्दल बोलायचे झाले तर समोर टेलीस्कोपिक फॉर्क्स आणि मागील बाजूस मोनो-शॉक युनिट वापरण्यात आले आहे. या दोन्ही स्कूटर त्यांच्या चांगल्या परफॉर्मन्स, फीचर्स आणि लूकसाठी ओळखल्या जातात.
Yamaha New Scooters: किंमत
नवीन 2023 Yamaha Fascino 125 Fi Hybrid ची किंमत 78,600 ते 91,030 रुपये (एक्स-शोरूम) आणि Ray-ZR 125 Fi Hybrid स्कूटरची किंमत 82,730 ते 93,530 रुपयांदरम्यान (एक्स-शोरूम) आहे.
या स्कूटरशी होणार स्पर्धा
देशांतर्गत बाजारात Hero Electric Optima, Hero Electric Photon, Bounce Infinity E1, Bajaj Chetak, Ola S1, Ather 450X, Vida V1, Honda Activa 6G, TVS Jupiter, Suzuki Access , Hero Destini , Hero Maestro Edge 125, Suzuki Burgman Street स्कूटर यामाहा Fascino 125 आणि Yamaha Ray-ZR शी स्पर्धा करत आहेत.
Car loan Information:
Calculate Car Loan EMI