Safari Adventure Persona Edition Launch : टाटा मोटर्सने गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये आपली सर्वात लोकप्रिय सफारीचा अ‍ॅडव्हेंचर पर्सोना एसयूव्ही (Safari Adventure Persona SUV) एडिशन लॉन्च केला होता. आता कंपनीने आपली हीच सफारी नवीन रंग पर्यायसह पुन्हा लॉन्च केली आहे. ग्राहकांसाठी ही सफारी ऑर्कस व्हाईट (Orcus White) रंगातही बाजारात उपलब्ध होणार आहे. आतापर्यंत टाटा सफारी अ‍ॅडव्हेंचर पर्सोना एसयूव्ही फक्त ट्रॉपिकल मिस्ट रंगात उपलब्ध होती. मात्र आता ग्राहकांना ती ऑर्कस व्हाईट कलरमध्येही मिळणार आहे.


फीचर्स 


सफारी अ‍ॅडव्हेंचर ऑर्कस व्हाइट कलर मॉडेलमध्ये वायरलेस चार्जर, एअर प्युरिफायर आणि पहिल्या आणि दुसऱ्या रांगेतील सीटमध्ये व्हेंटिलेशनसह इतर अनेक फीचर्स कंपनीने दिले आहेत. ही नवीन सफारी आपल्या स्पेशल बाहेरील कलर थीम आणि ब्लॅक-आउट अलॉय व्हीलमुळे मागील मॉडेलपेक्षा अधिक आकर्षक वाटते. कंपनीने ऑर्कस व्हाईट रंगामधील आपल्या या नवीन सफारीचा एक फोटो ही ट्विट केला आहे. हा फोटो पाहून ग्राहकांना ही सफारी नक्कीच आवडेल.


किंमत 


टाटा सफारीची किंमत 14.99 लाख (एक्स-शोरूम, दिल्ली) रुपयांपासून सुरू होते. तसेच Tata Safari Adventure ची किंमत भारतात सुमारे 21 लाख ते 22.4 लाख (एक्स-शोरूम, दिल्ली) रुपये आहे. सफारी अ‍ॅडव्हेंचर पर्सोना टॉप-स्पेक XZ+ आणि XZA+ ट्रिम्सवर आधारित आहे. या सफरीत नवीन फीचर्स दिल्यानंतर कंपनीने अ‍ॅडव्हेंचर पर्सोनाची मॅन्युअल आवृत्तीची किंमत आता 14,000 रुपयांनी महाग झाली आहे. तर याची ऑटोमॅटिक आवृत्तीची किंमत 24,000 रुपयांनी महाग झाली आहे.


इंजिन 


कंपनी आपल्या या नवीन एसयूव्हीमध्ये 2.0-लिटर डिझेल इंजिन दिले आहे. जे 168bhp पॉवर आणि 350 Nm पीक टॉर्क जनरेट करते. हे इंजिन सहा-स्पीड मॅन्युअल आणि पर्यायी 6-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशन युनिटशी जोडलेले आहे.


हे ही वाचा :



Car loan Information:

Calculate Car Loan EMI