Aurangabad News: औरंगाबादच्या (Aurangabad) गंगापूर तालुक्यात एक संतापजनक प्रकार समोर आला असून, मुलीला पळवल्याचा आरोप करत एका वृद्ध महिलेला विवस्त्र करून मारहाण (Beating) करण्यात आली आहे. धक्कादायक म्हणजे मारहाण करतानाचा व्हिडिओ तयार करत आरोपींकडून हा व्हिडीओ समाज माध्यमांवर व्हायरल देखील करण्यात आला आहे. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात (Gangapur Police Station) रविवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. 


पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, औरंगाबादच्या गंगापूर तालुक्यातील गंगापूर फाट्यावर असलेल्या पारधी वस्तीवर मारहाण झालेली वृद्ध महिला आपल्या नातवासोबत राहते. दरम्यान ओझर गावातील विवेक उर्फ चवल्या पिंपळे आणि त्याच्या साथीदारांनी पीडित वृद्ध महिलेच्या घरी जाऊन, तुमच्या नातूने आमची मुलगी पळून नेल्याचा आरोप केला. आरोपी एवढ्यावरच थांबले नाही, तर त्या वृद्ध महिलेला आपल्यासोबत गंगापूर फाट्यावरून, आरोपींनी आपल्या घरी नेले.


विवस्त्र करून मारहाण...


वृद्ध महिलेला ओझर येथील पारधी वस्तीवर आणल्यावर आरोपीने तिला मारहाण करायला सुरुवात केली. संतापजनक म्हणजे महिलेच्या अंगावरील सर्व कपडे काढून तिला विवस्त्र करत मारहाण करण्यात आली. यावेळी पीडित वृद्ध महिला हात जोडत होती, दयेची भीक मागत होती. मात्र आरोपींना तिच्यावर दया आली नाही. अंगावर शहारे आणणारा हा प्रकार तब्बल अर्धा तास सुरु होता. 


मारहाणीचा व्हिडीओ केला...


माझ्या मुलीला तुझ्या नातूने पळून नेलं म्हणून, वृद्ध महिलेला नग्न करून मारहाण करण्यात आली. आरोपी एवढ्यावरच थांबले नाही तर त्या महिलेचा मारहाण करतानाचा व्हिडिओ ही केला. संतापजनक म्हणजे तयार केलेला व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल सुद्धा केला. त्यामुळे अखेर या सगळ्या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने वृद्ध महिलेची मानसिक स्थिती खालावली असून, प्रचंड तणावात आहेत. 


आरोपीच्या शोधात पथक रवाना 


औरंगाबादच्या या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. तर वृद्धेला विवस्त्र करून मारहाण केल्याच्या घटनेनंतर आरोपी फरार झाले आहेत. त्यामुळे औरंगाबाद ग्रामीण पोलिसांकडून आरोपीचा शोध घेतला जात आहे. यासाठी एक विशेष पथक आरोपीच्या शोधासाठी रवाना करण्यात आले आहे. त्यामुळे आता आरोपी पकडले जाणार हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे. 


Crime News: 'लुटेरी दुल्हन'सह तिच्या साथीदारांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या, जातही खोटी सांगितली