एक्स्प्लोर

काँग्रेस बंडखोर अब्दुल सत्तार आणि मुख्यमंत्र्यांचं सेटिंग काय?

गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसवर नाराज असलेल्या अब्दुल सत्तार यांना भाजपप्रवेशाच्या ऑफर 'वर्षा'वरुन मिळत आहेत. ऑफरनंतर सत्तारांनी काही अटी ठेवल्या. मात्र भाजपप्रवेशाची ऑफर त्यांनी नाकारल्याची माहिती आहे.

औरंगाबाद : भाजप आणि काँग्रेस बंडखोर अब्दुल सत्तार यांचं काय सुरु आहे? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत का? असे प्रश्न उपस्थित होण्याचं कारण गेल्या आठ दिवसात सत्तार आणि मुख्यमंत्र्यांची मध्यरात्री दोन वेळा भेट झाली. गेल्या काही दिवसांपासून भाजपमध्ये जोरदार इन्कमिंग सुरु आहे. कोणी नाराज असल्याची बातमी माध्यमात धडकली, की भाजपची एक टीम त्या आमदार-खासदाराच्या संपर्कात राहते आणि थेट 'वर्षा'वरुन भेटीचं निमंत्रण येतं. त्यानंतर भाजपप्रवेशाच्या ऑफर दिल्या जातात. नाराज नेत्यांची मनं भाजपच्या वाटेवर वळवली जातात. गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसवर नाराज असलेल्या अब्दुल सत्तार यांनाही भाजपप्रवेशाच्या ऑफर 'वर्षा'वरुन मिळत आहेत. त्यांच्यासाठी औरंगाबाद स्पेशल विमान पाठवलं जात आहे. ऑफरनंतर सत्तारांनी काही अटी ठेवल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे सत्तारांनी भाजपप्रवेशाची ऑफर नाकारल्याचंही म्हटलं जातं. सत्तार यांनी आपल्या मुलाला स्थानिक स्वराज्य संस्थेतून आमदार करण्याची अट मुख्यमंत्र्यांकडे घातली. मात्र या जागेसाठी आधीच कुणालातरी आश्वासन दिल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. सत्तार सिल्लोड विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उभे राहतील. भाजपने त्यांना पाठिंबा द्यावा, असं सत्तार यांनी सांगितल्यावर मुख्यमंत्र्यांनी होकार दिल्याची माहिती आहे. त्यामुळे 'माझा'च्या माहितीनुसार सत्तार भाजपमध्ये प्रवेश करणार नाहीत. लोकसभा निवडणुकीत भरलेला अपक्ष अर्जही ते मागे घेतील, मात्र विधानसभेसाठी त्यांचं सेटिंग सुरु आहे. औरंगाबाद लोकसभा तिकीट वाटपावरुन नाराज असलेल्या अब्दुल सत्तार यांनी काँग्रेसला रामराम केला होता. सुभाष झांबड यांना काँग्रेसने दिलेली उमेदवारी मान्य नसल्याचं सांगत त्यांनी बंड पुकारलं होतं. लोकसभेच्या निवडणुकीत अपक्ष उभं राहणार असल्याचं सत्तार यांनी म्हटलं होतं. काँग्रेसने पत्ता कट केल्यानंतर सत्तारांनी काँग्रेस कार्यालयातील स्वत:च्या मालकीच्या खुर्च्याही उचलून नेल्या होत्या. आता सत्तारांची पुढची दिशा काय असेल, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे
संबंधित बातम्या
अब्दुल सत्तार-रावसाहेब दानवे एकाच विमानाने मुंबईत, भाजप प्रवेशाच्या चर्चांना उधाण
अब्दुल सत्तार यांची बंडखोरी अशोक चव्हाणांच्या गुप्त सूचनेनुसार?
औरंगाबाद काँग्रेसमध्ये खुर्च्यांवरुन राजकारण, राजीनाम्यानंतर अब्दुल सत्तारांनी पक्ष कार्यालयातील खुर्च्या सोबत नेल्या
औरंगाबाद लोकसभेच्या तिकीटावरुन काँग्रेसमध्ये जुंपली, आमदार अब्दुल सत्तारांनी बंड पुकारलं, अपक्ष लढणार

महत्त्वाच्या बातम्या

जत्रा-यात्रांमधील खाद्यपदार्थ विक्रेत्यांवर FDA चा वॉच; परवाना अनिवार्य, भगरीच्या विक्रीवरही लक्ष 
जत्रा-यात्रांमधील खाद्यपदार्थ विक्रेत्यांवर FDA चा वॉच; परवाना अनिवार्य, भगरीच्या विक्रीवरही लक्ष 
Accident News: ज्योत आणण्यापूर्वीच घराचा दिवा विझला! भीषण अपघातात तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; तुळजापूर मंदिरातून छत्रपती संभाजीनगरला ज्योत घेऊन परतताना कंटेनरची दुचाकीला धडक
ज्योत आणण्यापूर्वीच घराचा दिवा विझला! भीषण अपघातात छत्रपती संभाजीनगरच्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; तुळजापूर मंदिरातून ज्योत घेऊन परतताना कंटेनरची दुचाकीला धडक
हुकुमशाही आहे की आणीबाणी! भाजपला परिणाम भोगावेच लागतील, CJP च्या आंदोलनावरुन दावनेंचा सरकारवर हल्लाबोल 
हुकुमशाही आहे की आणीबाणी! भाजपला परिणाम भोगावेच लागतील, CJP च्या आंदोलनावरुन दावनेंचा सरकारवर हल्लाबोल 
मराठवाडा पदवीधर निवडणुकीत तिरंगी सामना; एका जागेसाठी 41 उमेदवार मैदानात, 13 जणांची माघार; महायुतीचं गणित सोप्प
मराठवाडा पदवीधर निवडणुकीत तिरंगी सामना; एका जागेसाठी 41 उमेदवार मैदानात, 13 जणांची माघार; महायुतीचं गणित सोप्प

व्हिडीओ

Shetitil Navdurga | Swati Kushare |‘शेतकरी’ म्हणवून घेण्याचा संकोच होता… आज त्याच ओळखीचा अभिमान आहे!
Majha Katta Dr. Abhijit Joshi : जेवण कसं जेवावं?नियम काय? आयुर्वेदात काय? डॉ.अभिजीत जोशी माझा कट्टावर | ABP Majha
Sanjay Raut PC : मोदी सरकार 6-7 महिन्यात दिसणार नाही, राऊतांचा मोठा दावा
Mann Suddha Tujha Season 3 : मंत्रचळ | मन सुद्ध तुझं | Episode 2 ABP Majha
Shetitil Navdurga : Sunita Raite : शिलाईच्या सुईपासून अवजार बँकेपर्यंत स्वावलंबनाचा प्रवास!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
या फोटोनं महाराष्ट्राच्या गृहखात्याचा निर्दयी चेहरा उघड केला, फडणवीस,मोदी वैगरे लोकांनी समाजाला कोणत्या नरकात ढकललं हेच दिसतं, 'तो' फोटो शेअर करत संजय राऊतांचा प्रहार
या फोटोनं महाराष्ट्राच्या गृहखात्याचा निर्दयी चेहरा उघड केला, फडणवीस,मोदी वैगरे लोकांनी समाजाला कोणत्या नरकात ढकललं हेच दिसतं, 'तो' फोटो शेअर करत संजय राऊतांचा प्रहार
Pune MPSC protest: पुण्यातील एमपीएससी आंदोलनात रात्री अचानक चक्र फिरली, पडद्यामागे काय घडलं? वाचा इनसाईड स्टोरी
पुण्यातील एमपीएससी आंदोलनात रात्री अचानक चक्र फिरली, पडद्यामागे काय घडलं? वाचा इनसाईड स्टोरी
Omraje Nimbalkar On MPSC Protest Pune: MPSC च्या आंदोलनस्थळी येताच विद्यार्थ्यांनी घातलेला गोंधळ; आता मागण्या पूर्ण होताच ओमराजे निंबाळकर म्हणाले...
MPSC च्या आंदोलनस्थळी येताच घातलेला गोंधळ; आता मागण्या पूर्ण होताच ओमराजे निंबाळकर म्हणाले...
सरन्यायाधीश सूर्यकांत यांनाच इंडिया आघाडीच्या सुप्रीम कोर्टावरच्या मोर्चावर ऑन कॅमेरा मीडियाचा सवाल अन् एकाच वाक्यात उत्तर, दिल्लीच्या लॉ अँड ऑर्डरवर विचारताच काय म्हणाले?
सरन्यायाधीश सूर्यकांत यांनाच इंडिया आघाडीच्या सुप्रीम कोर्टावरच्या मोर्चावर ऑन कॅमेरा मीडियाचा सवाल अन् एकाच वाक्यात उत्तर, दिल्लीच्या लॉ अँड ऑर्डरवर विचारताच काय म्हणाले?
Someshwar Sugar Factory Election Result : सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा पहिला निकाल आला, सुनेत्रा पवारांच्या पॅनलने खातं उघडलं, कोणता उमेदवार विजयी?
सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा पहिला निकाल आला, सुनेत्रा पवारांच्या पॅनलने खातं उघडलं, कोणता उमेदवार विजयी?
Pune News: राजगड किल्ल्यावर पर्यटकाचा हृदयविकाराने मृत्यू; मालकाच्या मृत्यूनंतरही निष्ठावान जुली राहिली सोबत, स्ट्रेचरच्या सहाय्याने किल्ल्यावरून खाली आणताना मागे-मागे आली अन्...
राजगड किल्ल्यावर पर्यटकाचा हृदयविकाराने मृत्यू; मालकाच्या मृत्यूनंतरही निष्ठावान जुली राहिली सोबत, स्ट्रेचरच्या सहाय्याने किल्ल्यावरून खाली आणताना मागे-मागे आली अन्...
इंडिया आघाडीचा आज सुप्रीम कोर्टावर अभूतपूर्व मोर्चा, पण सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगेंसह इंडिया आघाडीची भेट का नाकारली? चार कारणे दिली!
इंडिया आघाडीचा आज सुप्रीम कोर्टावर अभूतपूर्व मोर्चा, पण सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगेंसह इंडिया आघाडीची भेट का नाकारली? चार कारणे दिली!
Sunetra Pawar on Someshwar Sugar Factory Election Result : निवडणुकीचा निकाल आहे, किती विश्वास वाटतो? पत्रकारांचा प्रश्न; सुनेत्रा पवार स्मितहास्य करत म्हणाल्या, 21-0...
निवडणुकीचा निकाल आहे, किती विश्वास वाटतो? पत्रकारांचा प्रश्न; सुनेत्रा पवार स्मितहास्य करत म्हणाल्या, 21-0...
Embed widget