औरंगाबाद : कोरोनामुळे असंख्य नकारात्मक बातम्या आपण वाचल्या असतील, पहिल्या असतील. पण या कोरोनाच्या संकटात काही सकारात्मक गोष्टीही घडत आहेत. एकीकडे कोरोना झाला म्हणून मुलगा वडिलांचेच अंत्यसंस्कार करायला तयार नाही, असं चित्र आहे. परंतु, असं असलं तरी अनके लोक आपला जीव धोक्यात घालून माणूसकी जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत.




औरंगाबादेत अशीच एक माणूसकी दर्शवणारी घटना पहायला मिळाली. घटना शहरातील गजानन नगर भागातील आहे. याच भागात एका कुटुंबाला कोरोनाची लागण झाली आहे. घरातील सगळे लोक हॉस्पिटलमध्ये दाखल झाले. मात्र घरातील एका 74 वर्षीय वृद्ध व्यक्तीला चालताही येत नसल्याने त्यांना घरातच ठेवण्यात आलं. त्याच इमारतीत वरच्या मजल्यावर राहणार मुलगा त्यांची देखभाल करत होता. पण दोन दिवसांत त्यांची तब्येत खूपच बिघडली. आता त्यांना रुग्णल्यात दाखल करुन गरजेचं झालं. रुग्णवाहिका आली. मात्र त्यांना रुग्णवाहिकेपर्यंत घेऊन जाण्यास कोणीही तयार नव्हते. अनेकांना विनवणी करून कोणीही तयार झाले नाहीत. शेवटी भागात राहणाऱ्या जिल्हा परिषदेत कर्मचारी असलेल्या कृष्णा बोरसे यांनी स्वतः पीपीई किट घातलं. जीवाची पर्वा न करता त्यांनी त्यावृद्ध व्यक्तीला रुग्णवाहिकेपर्यंत पोहचवले. सोबत त्यांचा मुलगाही होता. पण त्यांना एकट्याला हे शक्य नव्हते, शेवटी बोरसे यांच्या मदतीने त्यांच्यावर घाटी रुग्णालयात उपचार सुरु झाले, पण दुर्दैवाने त्यांचा काही तासांतच उपचाादरम्यान मृत्यू झाला.


औरंगाबाद शहरात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शहरात संचारबंदी आहे. कोरोनाची लागण झालेल्या लोकांची संख्या दहा हजारांच्या जवळ पोहोचली आहे. कोरोनाच्या संकटात आपलेच सख्खे लोक दुरावत असताना या उदाहणातून आजही माणूसकी जिवंत आहे हे लक्षात येतं. काही दिवसांपूर्वी औरंगाबादेत बजाजनगर भागात दोन डॉक्टरांनी स्वतः पीपीई किट घालून एका अपंग आणि गतिमंद मुलाला उपचारासाठी रुग्णालयात पोहोचवले होते. त्यामुळे ही अशी सकारात्मक उदाहरण कोविड योद्ध्यांना कोविडसारख्या गंभीर आजाराशी सामना करताना बळ देत असतील.


महत्त्वाच्या बातम्या : 


मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर त्या -त्या जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांच्या सल्ल्याने प्रशासक नेमण्याला खंडपीठात आव्हान


महाजाॅब्स योजना महाराष्ट्र विकास आघाडी सरकारची की शिवसेना-राष्ट्रवादीची? : सत्यजीत तांबे