एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
औरंगाबादमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यावर वर्गमित्राकडून कटरने वार
औरंगाबाद मधील चाटे क्लासमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांवर त्याच्या वर्गमित्राने कटरने वार केला आहे.
औरंगाबाद : येथील चाटे क्लासमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांवर त्याच्या वर्गमित्राने कटरने वार केला आहे. या हल्ल्यात विद्यार्थी जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
औरंगाबादच्या जवाहरनगर भागातील चाटे कोचिंग क्लासेसमध्ये गणेश काळे हा विद्यार्थी शिकतो. त्याच्याच वर्गात शिकणाऱ्या वर्गमित्रामध्ये आणि गणेशमध्ये किरकोळ वाद झाला. या वादातून गणेशच्या पाठीवर त्याच्या मित्राने कटरने वार केला. यामध्ये गणेश जखमी झाला आहे.
गणेश आणि त्याच्या मित्रामध्ये गेल्या काही दिवसांपासून वाद सुरु होता. शुक्रवारी गणेश क्लासच्या बाहेर पाणी पिण्यासाठी गेला होता. तेव्हा पाठीमागून आलेल्या त्याच्या वर्गमित्राने त्याच्या पाठीवर कटरने वार केला. या हल्ल्यात जखमी झालेल्या गणेशवर शहरातील सिग्मा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
राजकारण
राजकारण
मुंबई
Advertisement