संभाजीनगर: राजकारणात काही नेते अगदी घट्ट मित्र आहेत, तर काही नेते अगदी कट्टर विरोधक. अनेकदा सोबत कोम करून, एकत्रित राहून देखील कधी ते मित्रासारखे वागत नाहीत, तर काही जण वेगवेगळ्या पक्षात असून एकमेंकाचे चांगले मित्र आहेत. याचं उदाहरण म्हणजे भाजप नेते रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) आणि शिवसेना मंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar). रावसाहेब दानवे आणि अब्दुल सत्तार यांचे संबंध जगजाहीर आहेत, असं असताना रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) आणि अब्दुल सत्तार एकमेकांची गळाभेट घेतली फोटोसेशन देखील केलं. त्यांच्या फोटोसेशनची चर्चा सध्या राज्याच्या राजकीरणात चर्चेचा विषय ठरत आहे.


रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) आणि अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांची संभाजीनगर येथे भेट झाली. बाहेर एकमेकांचे वाभाडे काढणारे दोन्ही नेते एकमेकांची गळाभेट घेताना दिसून आले. निवडणूक एकमेकाला हरून टोपी काढण्याची पैज लावणारे. सिल्लोड पाकिस्तान झाले म्हणणारे. रावसाहेब दानवे आणि सत्तार यांचे फोटोसेशन एकमेकांच्या खांद्यावर हसत खेळत संभाजीनगरच्या विमानतळावर फोटो काढले. यावेळी शिवसेना शिंदे गटाचे आमदार संदिपान भूमरे देखील उपस्थित होते. तर हे फोटो भागवत कराड यांनी काढल्याची माहिती आहे. 


सिल्लोडचा पाकिस्तान झालाय 


सत्तारांचा मतदारसंघ असलेला सिल्लोड हा पाकिस्तान होत चाललाय अशा शब्दात रावसाहेब दानवेंनी अब्दुल सत्तारांवर (Abdul Sattar) हल्लाबोल केला. माझा कट्टा या विशेष कार्यक्रमात दानवेंनी सत्तारांविरोधातील खदखद बोलून दाखवली होती.


सिल्लोडचे आमदार तथा मंत्री अब्दुल सत्तार आणि रावसाहेब दानवेंमध्ये (Raosaheb Danve) नवा वाद तसा जुनाच आहे. दोन्ही नेत्यांकडून एकमेकांवर आरोपांच्या फैरी  झाडल्या जातात. आणि याचं कारण ठरलं होतं दानवेंचा जालना लोकसभा मतदारसंघातून झालेला पराभव. सिल्लोड विधानसभा मतदारसंघ जालना लोकसभा मतदारसंघात येतो. पण सत्तार यांनी दानवेंचा प्रचार न करता काँग्रेसचा उमेदवार निवडून आणल्याचा आरोप होत आहे. यावरूनच रावसाहेब दानवे (Raosaheb Danve)यांनी सत्तार यांच्यावर हल्लाबोल करताना सिल्लोडचा पाकिस्तान होत असल्याचा आरोप केला होता. त्यावर बोलताना अब्दुल सत्तारांनीही पलटवार करत सिल्लोडला बदनाम करणं योग्य नाही, रावसाहेब दानवे यांच्या वक्तव्यचा परिणाम भाजपला भोगावे लागतील असा थेट इशाराच सत्तारांनी दिला होता.


“आजी माजी खासदार अन् एक लाख लोकांसमोर मी टोपी उतरवणार”


रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) पराभूत झाले तर मी माझी टोपी उतरवेन असा शब्द अब्दुल सत्तार यांनी कार्यकर्त्यांसमोर दिला होता.