Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या प्रांगणातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याचं आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या हस्ते अनावरण होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या प्रांगणामधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण होणार आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यांसह केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, केंद्रीय अर्थराज्यमंत्री,  भागवत कराड, सहकार मंत्री अतुल सावे, कृषीमंत्री अब्दुल सत्तार आणि संदिपान भुमरे उपस्थित रहाणार आहेत. हा सोहळा संध्याकाळी सहा वाजता पार पडणार आहे. 


शिवरायांचा 11 फूट उंच अश्वारुढ पुतळा


डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या प्रांगणातील छत्रपती शिवाजी महाराजांचा हा अश्वारुढ पुतळा 11 फूट उंच आहे. पंतधातूमध्ये बनवण्यात आलेल्या या पुतळ्याचं वजन सव्वा टन आहे. या पुतळा तयार करण्यासाछी 35 लाख रुपये निधी लागला. विद्यापिठाच्या प्रांगणात एका उंच चौथऱ्यावर हा पुतळा ठेवण्यात आला आहे. 7 सप्टेंबर रोजी हा पुतळा खुलताबाद येथून औरंगाबादमधील विद्यापीठात आणण्यात आला. विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. प्रमोद येवले यांनी खुलताबाद येथे पुतळ्याचे पुजन केलं त्यानंतर हा पुतळा विद्यापीठात आणण्यात आला.


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते अनावरण 


डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा बसवण्याचा प्रस्ताव माजी कुलगुरु डॉ. बी.ए.चोपडे यांच्या काळात मंजूर झाला होता. मात्र पुतळ्याची जागा, अंतर्गत विरोध आणि प्रशासकीय दिरंगाईमुळे हा प्रकल्प रखडला होता. त्यानंतर आज या बहुप्रतिक्षित आणि चर्चित पुतळ्याचं अनावरण होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या पुतळ्याचं अनावरण होईल.


महत्त्वाच्या इतर बातम्या