Nashik Malegaon News: स्विमिंग पूलमध्ये (swimming pool) हृदयविकाराचा झटका आल्याने एका 19 वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना नाशिक जिल्ह्यातील मालेगावमध्ये घडली आहे. 28 ऑगस्टच्या दुपारची ही घटना असून या घटनेचे सीसीटीव्ही फुटेजही आता समोर आले आहे. शिवाजी नगर परिसरात असलेल्या अस्पायर क्लबच्या स्विमिंग पूलमध्ये जयेश भावसार हा रविवारी नेहमीप्रमाणे पोहोण्यासाठी आला होता. मात्र यावेळी पोहत असतानाच त्याला त्रास जाणवला आणि तो स्विमिंग पुलमधून बाहेर पडण्याचा प्रयत्न करू लागला. हे बघताच इथं उपस्थित असलेल्या काही तरुणांनी त्याला बाहेर काढून छाती आणि पोट दाबत वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र हे सर्व प्रयत्न अपयशी ठरले आणि जयेशचा मृत्यू झाला.
रुणांमध्ये हृदयविकाराचं प्रमाण खूप वाढलं
हल्ली युवकांमध्ये हृदयविकाराचं प्रमाण खूप वाढलं आहे. बदलती जीवनशैली तसेच खाण्यापिण्याच्या सवयींमुळं अलीकडच्या काळात तरुणांमध्ये हृदयविकाराचं प्रमाण वाढलं आहे. मागील आठवड्यातच नाशिकच्या (Nashik) इंदिरानगर (Indiaranagar) येथील बांधकाम व्यवसायिक कौस्तुभ हुदलीकर (Kaustubh Hudlikar) यांचा हिमाचल प्रदेशात (Himachal Pradesh) ट्रेकिंगसाठी गेले असता हृदयविकाराचा (Heart Attack) झटका आल्याने मृत्यू झाला होता. तसेच मागील आठवड्यातच परभणीच्या सचिन तापडिया यांचा बॅडमिंटन खेळून बसल्यानंतर हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं होतं तर करण पवार या 20 वर्षीय मुलाचं देखील पोलिस भरतीदरम्यान धावताना हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं होतं.
हृदयाची, शरीराची क्षमता जाणून घेणे अत्यंत गरजेचे
हल्ली अनेक जण शरीर सुदृढ राहावे यासाठी जिमला जाणे, धावणे, वेगवेगळे खेळ खेळणे, सायकलिंग, ट्रेकिंग अशा अॅक्टिव्हिटी करत असतात. हे चांगले ही आहे मात्र हे करताना तुम्ही तुमच्या हृदयाची,शरीराची क्षमता जाऊन घेणे अत्यंत गरजेचे आहे.कारण तुम्हाला हृदयाचा त्रास असेल किंवा कुटुंबातील कुणाला हा आजार असेल,अनुवंशिकतेने आलेला हा आजार असेल अशा परिस्थितीत डॉक्टरांचा सल्ला न घेता तुमच्या हृदयाच्या,शरीराच्या क्षमतेपेक्षा जास्त व्यायाम केला अथवा शरीराला ताण दिला तर तुम्हाला हृदयविकाराचा झटका येऊ शकतो आणि तुमचा जीवही जाऊ शकतो ज्याला "सडन कार्डियाक डेथ"असे म्हणतात.
सध्या जगणं बदललं आहे. दिनक्रम बदलला आहे आणि पोषणही बदललं आहे. त्यामुळे आपल्या क्षमता पारखूनच आहार, विहार आणि उपचार गरजेचा आहे, असं तज्ञ सांगतात.
इतर महत्वाच्या बातम्या
Special Report : बॅडमिंटन खेळून बसल्यानंतर हृदयविकाराचा झटक्याने सचिन तापडिया यांचा मृत्यू