एक्स्प्लोर

मी राजकारणातील कुंभार! मडकं फुटलं की नवं तयार करतो, मी अनेक नेते तयार केले : रावसाहेब दानवे

Raosaheb Danve : आपणे गल्ली में तो हर कोई शेर होता है. त्यांच्यामध्ये हिम्मत असेल तर त्यांनी लोकसभेला माझ्या विरोधात उभा रहावं. मी तयार आहे, असे थेट आव्हान दानवे यांनी अब्दुल सत्तार यांना दिले आहे. 

Raosaheb Danve : मी राजकारणातील कुंभार आहे. हातातलं मडकं फुटलं की कुंभार  रडत नाही. फेकून देतो आणि पुन्हा नवं तयार करतो. मी अनेक नेते तयार केले आहेत, असे वक्तव्य भाजप नेते आणि केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केलं आहे. युवा मोर्चा भाकरी घरच्या डब्बा पार्टी कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी दानवे यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केलं. तुम्हला निवडणूकीसाठी तयार करायला आलोय, असेही दानवे म्हणाले. 

आजची परिस्थिती कशी आहे. भाजपा विरोधात सगळे उभे आहेत. हे वर्ष निवडणूकीचं आहे. नगरपंचायतमध्ये आम्ही दाखवून दिलं आहे, असे दानवे यांनी सांगितले. कार्यकर्ता कसा असला पाहिजे, मूळ नाही गाजर नाही हे उपटलं की एकटं निघते. कार्यकर्ता भुईमूगाच्या वेलासारखा पाहिजे, उपटला की गुच्छ, असे दानवे यांनी कार्यकर्त्यांना सांगितले. रविवारी रावसाहेब दानवे यांनी कार्यकर्त्यांसोबत डब्बा पार्टी केली. बहुतेक कार्यकर्त्यांनी घरून डब्बा आणला होता .

दरम्यान, रावसाहेब दानवे यांच्या डब्बा पार्टी कार्यक्रमात कोरोना नियमांचा फज्जा उडाला होता. उपस्थित असणाऱ्यांनी सोशल डिस्टन्सिंग नियमांचं पालन केलं नाही. इतकेच नाही तर कार्यक्रमात कुणाच्याही तोंडाला मास्क नव्हता. हे सर्व पाहिल्यानंतर कोरोना नियम राजकारण्यांना नाहीत का? असा प्रश्न उपस्थित राहतो. 

दानवेंचं सत्तार यांना आव्हान-
सत्तार म्हणतात की मी पंचायत समिती हरलो. आमचे 3 उमेदवार 15 मतांनी पडले. सत्तार यांना सोयगाव मध्ये 15 हजार मतांची आघाडी होती, ती 15 मतांवर आली आहे. हे म्हणतात मी सिल्लोड मधून त्याच्या विरोधात लढावं. आपणे गल्ली में तो हर कोई शेर होता है. त्यांच्यामध्ये हिम्मत असेल तर त्यांनी लोकसभेला माझ्या विरोधात उभा रहावं. मी तयार आहे, असे थेट आव्हान दानवे यांनी अब्दुल सत्तार यांना दिले आहे. 

सत्तार म्हणतात आता टोपी काढण्याची वेळ आली.( सत्तार यांनी दानवे हरल्याशिवाय टोपी काढणार नाही असा प्रन केला होता) या प्रश्नावर बोलताना दानवे म्हणाले की, काळजी करू नका हे दोघेही लोकसभेला माझाच प्रचार करतील. (सत्तार आणि खोतकर यांचे नाव न घेता उत्तर ) आणि मी त्यांच्या जीवावर थोडीच निवडणूक लढवतो माझ्याकडे कार्यकर्ते भरपूर आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

बालकांच्या शोषणाशी संबंधित अश्लील व्हिडिओंचा काळाबाजार, रॅकेट चालवणाऱ्या सराईत गुन्हेगारांना अटक 
बालकांच्या शोषणाशी संबंधित अश्लील व्हिडिओंचा काळाबाजार, रॅकेट चालवणाऱ्या सराईत गुन्हेगारांना अटक 
Abhijeet Dipke on RSS: ज्यांनी गांधींची हत्या केली, डॉ. आंबेडकरांचा विरोध केला त्यांनी आम्हाला संविधान शिकवू नये, अभिजीत दिपकेंनी RSS च्या बड्या नेत्याला सुनावलं
ज्यांनी गांधींची हत्या केली, डॉ. आंबेडकरांचा विरोध केला त्यांनी आम्हाला संविधान शिकवू नये, अभिजीत दिपकेंनी RSS च्या बड्या नेत्याला सुनावलं
धक्कादायक! रात्रीच्या प्रवासात खासगी ट्रॅव्हलमध्ये महिलेचा दोनवेळा विनयभंग; लाडक्या बहिणीच्या तक्रारीनंतर बस थेट पोलीस ठाण्यात
धक्कादायक! रात्रीच्या प्रवासात खासगी ट्रॅव्हलमध्ये महिलेचा दोनवेळा विनयभंग; लाडक्या बहिणीच्या तक्रारीनंतर बस थेट पोलीस ठाण्यात
Abhijeet Dipke on PM Modi: आधी मोदींना त्यांची डिग्री दाखवायला सांगा, मग मी....; वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी होताच अभिजीत दिपके संतापले
आधी मोदींना त्यांची डिग्री दाखवायला सांगा, मग मी....; वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी होताच अभिजीत दिपके संतापले

व्हिडीओ

Congress On Sunetra Pawar : गूंगी गुडियाचा टोला, वाद विकोपाला | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case Update : सियाचं कांड, लग्नाआधीच गुप्तहेरांना डिमांड | Special Report ABP Majha
Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला
Tukaram Mundhe News: तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !
BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
Embed widget