एक्स्प्लोर

Aurangabad: पिण्याच्या पाण्यावरून चौघांना भोसकले; वाळूज भागातील घटना

औरंगाबाद शहरातील पाणी प्रश्न आता गंभीर होत चालला असून, यातून हाणामारीच्या घटना समोर येत आहे.

Aurangabad Crime News: औरंगाबाद शहरातील आणि परिसरातील भागात पाणी प्रश्न गंभीर होत चालला आहे. पाणीपुरवठा सुरळीत करताना प्रशासन सुद्धा हतबल होतांना पाहायला मिळत आहे. अशात आता पिण्याच्या पाण्यावरून नागरिकांमध्ये हाणामारीच्या घटना समोर येत आहे. वाळूज महानगर भागात नळाचे पाणी भरण्यावरून दोन कुटुंबीयांत जोरदार हाणामारी होऊन चौघांना चाकूने भोसकल्याची घटना घडली आहे. त्यांनतर परस्परविरोधी तक्रारीवरून सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, रांजणगाव शेणपुंजी येथील प्रभाकर चोरमले हे कुटुंबासह किरायाच्या घरात राहतात. बाजूलाच दुसऱ्या खोलीत भाऊसाहेव दळवी यांचे कुटुंब सुद्धा किरायाने राहतात. काही दिवसांपासून सामायिक नळाचे पाणी भरण्यावरून दळवी आणि चोरमले कुटुंबात वाद व्हायचे. दरम्यान शनिवारी सायंकाळी दोन्ही घरांतील महिलांचा पुन्हा पाण्यावरून वाद झाला. या वादानंतर रात्री दळवी कुटुंबातील तिघांनी चोरमलेंच्या घरी जाऊन त्यांना अश्लील शिवीगाळ केली.

आईला शिवीगाळ केली जात असल्याने संकेत चोरमले हा समजावण्यासाठी घराबाहेर आला. यावेळी योगेश दळवी याने संकेतवर चाकूने वार केले. संकेतने मदतीसाठी आरडाओरडा केला असता त्याचे आई-वडील आले. योगेशने प्रभाकर चोरमले यांच्यावर सुद्धा चाकूने दोन तर, चोरमले यांच्या पत्नीवर एक वार केला.

परस्परविरोधी गुन्हे दाखल... 

घटनेची महिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनतर पोलिसांनी गंभीर जखमी चार जणांना शासकीय रुग्णालयात दाखल केले असून,त्यांच्यावर उपचार सुरु आहे. तर याप्रकरणी संकेत चोरमले यांनी भाऊसाहेब, योगेश, महेश व दळवीबाई यांच्याविरुद्ध तक्रार दिली आहे. तर भाऊसाहेब दळवी यांनीही प्रभाकर चोरमले, संकेत चोरमले व नितीन चोरमले यांनी आपल्याला व कुटुंबीयांना मारहाण केल्याची तक्रार दिली. यावरून दोन्ही कुटुंबांतील 7 जणांविरुद्ध एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

पाणी प्रश्न गंभीर...

औरंगाबाद शहरातच नव्हे तर आता परिसरातील आणि ग्रामीण भागात सुद्धा पाणी टंचाई जाणवत आहे. त्यामुळे पाण्यासाठी नागरिकांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे. तर पिण्याच्या पाण्यावरून आता वाद होताना सुद्धा पाहायला मिळत आहे. त्यातच वाळूजच्या घटनेनंतर पिण्याच्या पाण्याची परिस्थिती किती गंभीर बनली आहे, याचा अंदाज येऊ शकतो.

About the author मोसीन शेख

मोसीन शेख
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Uddhav Thackeray Eknath Shinde Shivsena With Abhijeet Dipke: अभिजीत दीपकेंना आपल्यासोबत ठेवण्यासाठी दोन्ही शिवसेनेची रस्सीखेच; कॉकरोच जनता पार्टीचं आंदोलन संपताच पुढे काय काय घडलं?
अभिजीत दीपकेंना आपल्यासोबत ठेवण्यासाठी दोन्ही शिवसेनेची रस्सीखेच; कॉकरोच जनता पार्टीचं आंदोलन संपताच पुढे काय काय घडलं?
Tukaram Munde FDA News: सुट्टीच्या दिवशीही काम, FDA च्या 29 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची तक्रार; तुकाराम मुंढेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
सुट्टीच्या दिवशीही काम, FDA च्या 29 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची तक्रार; तुकाराम मुंढेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
Abhijeet Dipke On Amit Shah: तुम्ही चाणक्य कसले, हे तर तुमचं अपयश, राजीनामा द्या; अभिजीत दीपकेंचा थेट अमित शाहांवर निशाणा
तुम्ही चाणक्य कसले, हे तर तुमचं अपयश, राजीनामा द्या; अभिजीत दीपकेंचा थेट अमित शाहांवर निशाणा
Tukaram Munde FDA News: तुकाराम मुंढेंना डबल धक्का; 29 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची तक्रार, नरहरी झिरवळांना पत्र धाडलं, नेमकं काय घडलं?
तुकाराम मुंढेंना डबल धक्का; 29 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची तक्रार, नरहरी झिरवळांना पत्र धाडलं, नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report
Nashik Potholes Mahajan vs Bhujbal : खड्ड्यांवरुन खळबळ; महाजन भुजबळ भिडले Special Report
Chandrakant Patil : बोटांचे ठसे, चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावरून हसे Special Report
Parinay Fuke On Uddhav Thackeray : अभिजीत दिपके कृष्णाचे अवतार, तर उद्धव ठाकरे कंसाचे अवतार
Food Safety : फळं भाज्यांवरील 99% कीटकनाशके हटवणारे 'Sophab' द्रावण; पुण्यातील शास्त्रज्ञांचं संशोधन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bankipur, Datia Exit Poll : भाजप की जन सुराज, नितीन नवीन यांच्या बांकीपूरमध्ये कोण जिंकणार? दतियामध्ये काय घडणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर
भाजप की जन सुराज,बांकीपूरमध्ये कोण जिंकणार? दतियामध्ये काय घडणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर
Narendra Modi : हा सांस्कृतिक धक्का, मुली अशा प्रकारची भाषा कशी वापरू शकतात, मला मुलांना माफ करायचंय : नरेंद्र मोदी
जंतर मंतरवर जे झालं ते जगानं पाहिलं, भरकटलेल्या मुलांना मार्ग दाखवणं आपलं काम : नरेंद्र मोदी 
अंजनी नदीच्या पुरात अडकला तरुण, पाच तासांवर झाडावरची कसरत; बचावासाठी मोठा अडथळा, पथकाचे प्रयत्न
अंजनी नदीच्या पुरात अडकला तरुण, पाच तासांवर झाडावरची कसरत; बचावासाठी मोठा अडथळा, पथकाचे प्रयत्न
MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ
Nitin Gadkari on E20 Petrol: E-20 पेट्रोलमुळे कोणत्या वाहनांचे नुकसान? केंद्र सरकारची पहिल्यांदाच कबुली; नितीन गडकरींची राज्यसभेत लेखी माहिती
E-20 पेट्रोलमुळे कोणत्या वाहनांचे नुकसान? केंद्र सरकारची पहिल्यांदाच कबुली; नितीन गडकरींची राज्यसभेत लेखी माहिती
Embed widget