Sankranti 2023: संक्रांत सणाला सौभाग्याचं लेणं म्हणून महिला (woman) नवीन बांगड्या (Bangles) भरण्याची प्रथा आणि परंपरा वर्षानुवर्ष चालत आली आहे. त्यामुळे औरंगाबाद (Aurangabad) येथील बांगड्यांच्या मार्केटमध्ये महिलांनी बांगड्या खरेदीसाठी गर्दी केलीय. पण यावर्षी 'पिवळ्या रंगाची बांगडी नको गं बाई' म्हणत महिलांनी या रंगाकडे पाठ फिरवली आहे. त्याचं कारण म्हणजे यावर्षी संक्रांत (Sankranti 2023) पिवळ्या रंगावर (Yellow color) आहे, असे महिला सांगत असल्याचे बांगड्या विक्रेत्यांकडून सांगण्यात येत आहे.
महिलांसाठी बांगड्या म्हणजे जीव की प्राण, ज्या कलरची साडी त्याच कलरला शोभेल अशा बांगड्या खरेदी करण्याची अशात क्रेज आहे. बांगड्यांचा दुकानात महिलांची नेहमीच वर्दळ असते. त्यात आता संक्रांत जवळ आल्याने सौभाग्याचं लेणं म्हणून, नवीन बांगड्या खरेदी करण्याची प्रथा आणि परंपरा आहे. त्यामुळे सद्या बांगड्यांच्या दुकानात गर्दी पाहायला मिळत आहे. पण यावर्षी प्रत्येक महिला पिवळ्या कलरची बांगडी नको असं म्हणत आहे. त्याचं कारण आहे यावर्षीची संक्रांत ही पिवळ्या कलरवर आली आहे. त्यामुळेच महिला म्हणतायत पिवळ्या रंगाची बांगडी नको गं बाई....
यंदा पिवळ्या रंगावर संक्रात!
यंदा संक्रांतीचे वाहन वाघ आणि उपवाहन घोडा आहे. ही संक्रांत कुमारी अवस्थेतील असून, पिवळे वस्त्र नेसलेली आहे. पिवळ्या रंगाने रंगवलेल्या वस्तू परिधान करू नये, पण नैसर्गिक पिवळ्या रंगाच्या वस्तू, अलंकार चालतील. या वर्षी वाण देणे घेणे हळदी-कुंकू यासाठी पर्वकाळ सूर्योदय ते सूर्यास्त असल्याचं गुरुजी सुभाष मुळे म्हणाले आहेत.
पिवळ्या बांगड्या वर्षभर सांभळून ठेवण्याची वेळ
दुकानात गेल्यावर महिला महिला हिरव्या, लाल रंगाच्या बांगड्या खरेदी करीत आहे. मात्र, पिवळ्या रंगाची बांगडीला हातही लावत नाही. कारण यंदा संक्रांत पिवळ्या रंगावर आहे, असे महिला सांगत असल्याचे बांगड्या विक्रेत्यांनी सांगितले. त्यामुळे दुकानदाराकडे असलेल्या पिवळ्या रंगाच्या बांगड्या त्या वर्षभर त्यांना सांभाळून ठेवावे लागणार आहेत.
पिवळे कपडेही खरेदी करेना!
संक्रांत सणासाठी शहरात अडीच लाख डझन बांगड्या आणण्यात आल्या आहेत. यातील 1 लाख डझन बांगड्या ग्रामीण भागात विक्रीला पाठविण्यात आल्या आहेत. रंग हे मानवाची नव्हे, तर निसर्गाची देण आहे. विज्ञानवादी युगातही महिला पिवळ्या रंगावर संक्रांत आली म्हणून पिवळ्या बांगड्या, पिवळ्या कपडे परिधान करणार नाहीत. त्यामुळे केवळ बांगड्याच नाही तर पिवळ्या रंगाचे कपडे देखील महिला खरेदी करत नसल्याचे चित्र आहे.