Aurangabad News: शिंदे गटाने केलेल्या बंडखोरीनंतर उद्धवसेनेला गळती लागली आहे. अनेक आमदार,खासदार आणि प्रमुख नेत्यांनी शिंदे गटात सहभागी होणे पसंद केले आहेत. त्यातच आता आणखी दोन उद्धवसेनेचे आमदार फुटणार असल्याचा दावा रोहयो मंत्री संदिपान भुमरेंनी केला आहे. त्यांच्या या दाव्याने आता ते दोन आमदार कोण अशी चर्चा पाहायला मिळत आहे. 


शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष, डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशनतर्फे धर्मवीर आनंद दिघे पुण्यतिथीनिमित्त पैठण येथे रक्तदान शिबीराचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. यावेळी बोलतांना भुमरे यांनी युवा सेनाप्रमुख आदित्य यांच्यावर निशाणा साधत उद्धवसेनेचे दोन आमदार फुटणार असल्याचा दावा केला आहे. 


काय म्हणाले भुमरे 


यावेळी बोलतांना भुमरे म्हणाले की, उद्धव सेनेत सध्या मुक्कामी असलेले दोन आमदार लवकरच फुटून शिंदेसेनेत येणार आहेत. एक जण येऊन आम्हाला भेटला असून दुसरा सुद्धा संपर्कात असल्याचं भुमरे म्हणाले. तर पैठणच्या बिडकीन गावात आदित्य ठाकरेंनी घेतलेल्या सभेपेक्षा गारुड्याच्या खेळाला जास्त गर्दी होते, अशीही टीका त्यांनी केली. तसेच राज्यत नव्याने आलेल्या सरकारच्या मंत्रीमंडळाच्या विस्तारावेळी मी राज्यमंत्रीपद मागितले होते. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मला कॅबिनेट मंत्रीपद दिल्याचही भुमरे म्हणाले. 


भुमरेंच्या कार्यक्रमाकडे शिवसैनिकांनी फिरवली पाठ...


कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर भुमरे पहिल्यांदाच शनिवारी पैठण शहरात आले होते. यावेळी त्यांच्या कार्यक्रमासाठी जय्यत तयारी सुद्धा करण्यात आली होती. मात्र प्रत्यक्षात कार्यक्रमाची ठिकाणी शिवसैनिकांनी पाठ फिरवल्याचे पाहायला मिळाले. मोजकेच कार्यकर्ते समोर बसले होते. विशेष म्हणजे त्यातील सुद्धा अनेकजण बाहेर गावातून आलेले होते. त्यामुळे पैठण शहरातील शिवसैनिकांनी भुमरे यांच्या कार्यक्रमाकडे पाठ फिरवल्याने याची चर्चा तालुक्यात पाहायला मिळाली. 


महत्वाच्या बातम्या... 


माझ्या आधी खैरेंचा सत्कार कसा करता म्हणत शिरसाट भरकार्यक्रमातून उठून निघाले; जलील यांनी थांबवलं


Aurangabad: मंत्री झाल्यावर मतदारसंघात परतलेल्या भुमरेंच्या कार्यक्रमाकडे शिवसैनिकांनी पाठ फिरवली; दानवेंकडून व्हिडिओ ट्वीट