Aurangabad News: औरंगाबाद पोलीस आयुक्तालयाच्यावतीने गणपती उत्सवानिमित्त शहरातील संत एकनाथ रंगमंदिरामध्ये एका बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. या बैठकीला सत्तांतर झाल्यानंतर दोन्ही गटाचे नेते एकाच सभाग़हात एकत्र येण्याची ही पहिलीच वेळ होती. त्यामुळे सर्वांचेच त्याच्यांकडे लक्ष होते. त्यामध्ये सर्वात पहिली चकमक उडाली ती आमदार संजय शिरसाट आणि पोलिस विभागात. कारण शिरसाट यांच्या आधी शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांचे नाव उच्चारल्याने शिरसाट नाराज झाले आणि भरकार्यक्रमातून उठून निघाले. मात्र त्याच्या बाजूलाच बसलेल्या खासदार इम्तियाज जलील यांनी त्यांचा हात धरून थांबवलं. 


त्याचे झालं असे की, सत्काराच्या वेळी सुत्रसंचालन करणाऱ्या सहायक आयुक्तांनी व्यासपीठावरील खैरे यांचे पहिले नाव घेताच दुसऱ्या टोकाला इम्तियाज यांच्या जवळ बसलेले शिरसाट यांनी आश्चर्यकारकरीत्या पाहत क्षणार्धात ताडकन उठत रामराम करत निघाले. जलील यांनी त्यांचा हात धरला. काय झाले, कोणाला कळेना. तेव्हा शिरसाटांनी रागात टिप्पणी करत प्रोटोकॉल आहे कि नाही, असे म्हणाले. त्यानंतर कराड, सावे यांनी बसण्याचा आग्रह धरला. इम्तियाज यांनी त्यांचा हात सोडलाच नाही. त्यानंतर आयुक्त गुप्ता यांनी छातीवर हात ठेवत अधिकाऱ्यांना तत्काळ बदल करण्यास सांगितले. एकच धावपळ उडाली आणि नंतर वातावरण शांत झाले.


सिनियर होंगे तो घर पे लेके जाओ...


खैरे यांचे नाव आधी घेतल्याने शिरसाट यांचा पारा चढला होता. मात्र इतर नेत्यांनी पुढाकर घेऊन त्यांना बसण्याची विनंती केली. त्यामुळे शिरसाट यांचा राग काही प्रमाणात कमी झाला. मात्र याचवेळी समोर बसलेल्यांमध्ये एकाने, खैरे साहाब, सिनियर है ना, क्या हुआ, अशी टिप्पणी केली. त्यावर शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांनी सिनियर होंगे तो घर पे लेके जाओ, अशी खोचक टिप्पणी केली आणि सभागृहात एकच हषा पिकला. त्यानंतर खैरे यांच्या चेहऱ्यावर मात्र पुर्ण कार्यक्रम शांत भाव होते.
 
सावेंची फटकेबाजी...


एकीकडे आपला सन्मान झाला नसल्याचा शिरसाट यांना राग आला असतांना दुसरीकडे सहकार मंत्री अतुल सावे सावे यांनी आपल्या भाषणातून आणखी फटकेबाजी करत टोला लगावला. भाषण करत असताना सावे यांनी मनपाच्या कामांवर टिका करत सुचना केल्या. त्यावेळी खैरे यांनी त्यांना काहीतरी सांगितले. त्यावर सावे म्हणाले, मी ज्युनिअर मंत्री आहे. दुसऱ्याच टर्ममध्ये आमदारकी भेटली. इतरांसारखे नाही. इतरांनाही भेटेलच, असा अप्रत्यक्ष टिप्पणी केली. त्यावर कराडांनी सर्वाधिक मंत्री असलेला आपला जिल्हा आहे. आणखी एक भेटेल, असे म्हणत एक आणखी एका मंत्रीपदाच्या आशा पल्लवीत केल्या. त्यावर शिरसाट मात्र स्मीतहास्य करत होते. 


पोलीसांवरही टीका...


यावेळी सावे यांनी आपल्या भाषणातून मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची सद्या सुरू असलेल्या अडवणूकीवरुन पोलिसांवर सुद्धा टिका केली. पदाधिकाऱ्यांना अडवताच ते मला कॉल करतात. मग मी पीआय ला करतो. पीआय म्हणतो, तुम्ही एसीपी ला बोला. मग एसीपीला बोलावे लागते. एसीपी म्हणतो डिसीपी ला करा, डिसीपी म्हणतात सीपींना बोला. अरे काय लावलंय? अहो सीपी साहेब, एका कामासाठी सगळ्यांना कॉल करावा लागतो, आम्ही लोकप्रतिनिधी आहोत, काहीतरी पध्दत निश्चित करा, अशी मागणी सावे यांनी केली. 


महत्वाच्या बातम्या...


Aurangabad: मंत्री झाल्यावर मतदारसंघात परतलेल्या भुमरेंच्या कार्यक्रमाकडे शिवसैनिकांनी पाठ फिरवली; दानवेंकडून व्हिडिओ ट्वीट


Aurangabad: औरंगाबादमध्ये तब्बल 62 लाखांचा विदेशी दारूसाठा पकडला, राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई