Aurangabad News: आशिया खंडातील सर्वात मोठं मातीचं धरण म्हणून ओळख असलेलं जायकवाडी प्रकल्प भरण्यासाठी दोन फुट शिल्लक राहिला आहे. त्यामुळे उद्या सकाळी साडेदहा वाजेच्या दरम्यान पाणी सोडले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यासाठी धरण प्रशासनाकडून तयारी करण्यात येत असल्याची माहिती सुद्धा समोर आली आहे. सद्या या धरणात 89.70 टक्के पाणीसाठा आहे. तर धरण भरण्यासाठी दोन फुट शिल्लक आहे. 


जुलै महिन्यातच नाशिक जिल्ह्यात दमदार पाऊस झाल्याने वरील धरणे पूर क्षमतेने भरली गेली. त्यामुळे या धरणांमधून गोदावरी नदीत विसर्ग करण्यात आला. पाण्याची आवक मोठ्याप्रमाणावर झाल्याने जायकवाडी धरणातील पाणीपातळी झपाट्याने वाढली. सद्या धरणात 89.70 टक्के पाणीसाठा आहे. तसेच 30 ह्जारांची आवक सुद्धा सुरु आहे. त्यामुळे उद्या सकाळी धरणातून पाण्याचा विसर्ग केला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 


आत्ताची परिस्थिती...


तब्बल 1522 फुट एवढी क्षमता असलेल्या जायकवाडी धरणात सद्या 1520.10 एवढा पाणीसाठा आहे. तर धरण 89.70 टक्के भरले आहे. तसेच धरणात 30 हजार 456 क्युसेकने पाण्याची आवक सुरु आहे. त्यामुळे धरणातील पाण्याचा जिवंत साठा 1947 दलघमी झाला आहे. 


गोदावरी काठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा


जायकवाडी धरणातून पाणी सोडल्यावर याचा परिणाम गोदावरी काठावर गावांवर होतो. त्यामुळे पाणी सोडण्यापूर्वी नदी काठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात येतो. जायकवाडीतून पाणी सोडल्यावर मराठवाड्यातील पंधराशेहून अधिक गावांना याचा फटका बसतो. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने या गावांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या गेल्या आहेत. यापूर्वीच उजव्या कालव्यातून पाणी सोडण्यात आले आहे. त्यांनतर आता थेट मुख्य दरवाज्यातून उद्या पाणी सोडण्याचे नियोजन प्रशासनाकडून सुरु आहे. 


महत्वाच्या बातम्या...


विदर्भ, मराठवाड्यासह अतिवृष्टीग्रस्त भागात ओला दुष्काळ जाहीर करा; अजित पवारांचं सरकारला पत्र


Aurangabad: जिल्ह्यात ढगाळ वातावरण, दोन दिवसांपासून सूर्यदर्शन नाहीच; शेतकऱ्यांची चिंता वाढली