Aurangabad: गेल्या पंधरा दिवसांपासून सुरु असेलेल्या पावसाने दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा रिमझिम हजेरी लावली आहे. तर कालपासून जिल्ह्यात जिल्ह्यात ढगाळ वातावरण असून,  सूर्यदर्शन होत नसल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 54 टक्के पाऊस पडला असून, अजूनही अनेक ठिकाणी भुरभुर सुरूच आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत आला असून, शेतातील कामे ठप्प झाले आहेत. 


औरंगाबाद जिल्ह्यात 8 जुलैपासून पावसाचा जोर वाढला. गेल्या आठवड्यातील दोन दिवस सोडले तर पावसाच्या सरी कमी-अधिक प्रमाणात सुरूच आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 54 टक्के पाऊस पडला असून, सर्वच तालुक्यात 50 टक्केपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. जून महिन्यात जिल्ह्यात 102 टक्के पाऊस झाला आहे. तर जुलै महिन्यात आतापर्यंत 100 टक्क्यांच्या पुढे पाऊस झाला असून, आणखी पाच दिवस शिल्लक आहे. 


दोन दिवसांपासून सूर्यदर्शन नाही...


दोन दिवसांच्या ब्रेकनंतर रविवारी पुन्हा एकदा पावसाने जिल्ह्यात हजेरी लावली होती. जिल्ह्यातील 65 मंडळात रविवारी पावसाने हजेरी लावली. तर दिवसभरात 9 मिलिमीटर पावसाची नोंद रविवारी झाली आहे. तर आज सकाळपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण असून, सूर्यदर्शन झाले नाही. 


शेतकरी अडचणीत...


औरंगाबाद जिल्ह्यात मोठ्याप्रमाणावर खरीपाची पेरणी झाली आहे. त्यामुळे कापूस, सोयाबीन, बाजरी, तूर, मुंग अशा पिकांची लागवड झाली आहे. मात्र चांगल्या पावसामुळे पिकांमध्ये झालेलं गवत मोठ्याप्रमाणावर वाढत आहे. तर सततच्या पावसामुळे शेतातील कामे ठप्प पडली आहेत. तर अधिक पावसामुळे पिकं पिवळी पडत आहे.  


महत्वाच्या बातम्या...


Maharashtra Rain Live Updates : राज्यात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; पाहा ठिकठिकाणचे अपडेट्स


Rain: मराठवाड्यासह विदर्भात पावसाची रिपरिप