Aurangabad News: गेल्या काही दिवसांपासून राज्यभर गाजत असलेल्या शिक्षक पात्रता चाचणी( टीईटी ) घोटाळ्यासंबंधी राज्यातील 7880  शिक्षकांवर कारवाई करण्यात आली आहे.  विशेष म्हणजे यातील सर्व शिक्षकांचे वेतन थांबविण्यात आलेले आहे. दरम्यान हिंगोली जिल्ह्यातील तीन शिक्षकांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात राज्यशासनाच्या वेतन थांबवण्याच्या आदेशाविरोधात याचिका दाखल केली आहे. तर या याचिकेवर न्यायमूर्ती रवींद्र घुगे व न्यायमूर्ती अरुण पेडणेकर यांच्यासमोर 20 सप्टेंबर रोजी सुनावणी ठेवण्यात आली आहे. 


शिक्षक पात्रता चाचणीत अपात्र असतांना देखील राज्यातील 7880  शिक्षकांना पात्र दाखवण्यात आल्याचा घोटाळा समोर आला आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्य परीक्षा मंडळाने 3 ऑगस्ट 2022 रोजी आदेशाद्वारे संबंधित शिक्षकांचे वेतन थांबविण्याचे आदेश काढले होते. त्या अनुषंगाने 18  ऑगस्ट २०२२ रोजी शिक्षण संचालक पुणे यांनी सदरील शिक्षकांचे शालार्थ आयडी पुढील आदेशापर्यंत गोठलेले आहे. या कारवाईमुळे शिक्षकांचे पगार पुढील आदेशापर्यंत होऊ शकणार नाही. याच आदेशाच्या विरोधात आता शिक्षकांनी न्यायालयात धाव घेतली आहे. 


एकतर्फी कारवाई करणे योग्य नव्हे...


शिक्षकांनी अॅड.संभाजी टोपे यांच्यामार्फत खंडपीठात याचिका दाखल केल्या आहेत. टीईटी उत्तीर्ण होणे बंधनकारक नसल्याचे याचिकेत नमूद करण्यात आले असून, प्राथमिक शिक्षकांसाठी एक ते आठ वर्गापर्यंत प्रवेश पात्रता परीक्षा लागू असल्याचे म्हटले आहे. शासनाचा 28  मार्च 2013  चा निर्णय उपलब्ध असून या शिक्षकांना अनुदान तत्त्वावर वेतन दिले जाते. त्यांच्या नियुक्त्या शिक्षणाधिकारी यांनी मान्य केल्या असल्याचे म्हटले आहे. अशावेळी यांच्याविरुद्ध सुनावणीची संधी न देता एकतर्फी कारवाई करणे योग्य नसल्याचे याचिकेत म्हटले आहे.


सत्तार यांच्या संस्थेतील 10 ते 12  जणांचे नाव टीईटी घोटाळ्यात 


राज्यात गाजत असलेल्या टीईटी घोटाळ्यात कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या दोन मुलींची नावं आल्याने मोठी खळबळ उडाली होती. असे असतांना आता सत्तार यांच्या शैक्षणिक संस्थेतील 10 ते 12  जणांचे नाव टीईटी घोटाळ्यात असल्याचा आरोप विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे. त्यांच्या या आरोपाने सत्तार यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. तर आपल्या मुलींचे नावं टीईटी घोटाळ्यात कशीकाय आलेत आणि कोणी आणले हे मलाच माहित नसल्याचं सत्तार यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे. 


महत्वाच्या बातम्या...


Aurangabad: गणेशोत्सवात डीजे, डॉल्बी वाजवण्यावर बंदी; औरंगाबाद जिल्हाधिकाऱ्यांकडून 144 चे आदेश


Aurangabad : तुम्हाला भाजप बोलायला लावतो; अण्णा म्हणाले मी, भाजपच्या अनेक नेत्यांना...


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI